
युवासैनिकांणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – रविराज बडे,सुजित शिंदे
राज्यात अलिकडेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा तब्बल साठ जांगावर विजय मिळवला असुन या पार्श्वभुमिवर युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांणी युवासेनेच्या माध्यमातुन हा विजय साजरा करत संघटना बांधणी वर लक्ष घातल्याचे दिसून येत आहे, याचाच भाग म्हणून संपुर्ण राज्य भर युवा विजय दौरा आयोजित करण्यात आला आहे याचाच दुसरा टप्पा हा बिड जिल्ह्यात पार पडत असुन या दौर्याच्या माध्यमातुन संघटनेला मजबुतिने उभा करण्यात मोठी मदत प्राप्त होणार असुन जुण्या नव्या युवासेना पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन युवासेना जिल्हाध्यक्ष रविराज बडे व युवासेना जिल्हाध्यक्ष सुजित शिंदे यांनी केले असुन सदरील युवासेना विजयी दौरा बीड चा
दुसरा टप्पा हा दिनांक: 23/02/2025 रोजी परळी येथून सुरु होणार असुन तो पुढील प्रमाणे असणार आहे
1) परळी येथे सकाळी 11.00 वा प्रभु वैद्यनाथचे दर्शन
2) शासकीय विश्रामगृह येथे 11.30 वा. पदाधिकारी बैठक
3) अंबाजोगाई येथे दु. 1.00 वा. योगेश्वरी देवी दर्शन
4) अंबाजोगाई शिवसेना तालुका पक्ष कार्यालय येथे भेट व पदाधिकारी बैठक दु. 1.30 वा.
5) केज माधवबाग येथे पदाधिकारी बैठक दु. 4.00 वाजता.
दिनांक रोजी पहिल्या दिवसाची सांगता होईल तर
दुसर्या दिवशी म्हणजे 24/02/2025 रोजी सकाळी
१)वडवणी तालुका बैठक- युवा सेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालय वडवणी येथे सकाळी 10.00 वा.
2) धारुर तालुका बैठक 12.30 वा. स्थळ शासकीय विश्रामगृह धारुर
3) माजलगांव तालुका बैठक व्यंकटेश हॉल माजलगांव 2.00 वा.
4) गेवराई तालुका बैठक शिवसेना पक्ष कार्यालय सायं 5.00 वा. सांगता होईल तर तिसऱ्या दिवसाची सुरवात ही दिनांक: 25/02/2025 रोजी सकाळी 1) पाटोदा शासकीय विश्रामगृह पाटोदा सकाळी 11.00 वा.
2) उपळी शासकीय विश्रामगृह आष्टी दु. 2.00 वा.
3) शिरुर (का.) येथे चाय पे चर्चा सायं. 5.00 वा.सागता होईल व सदरील दौर्याची सांगता ही बीड येथे दिनांक : 26/02/2025 रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह बीड विधानसभा पदाधिकारी बैठकीच्या माध्यमातुन करण्याचे आयोजन केले असल्याचे बीड जिल्हाध्यक्ष रविराज बडे व सुजीत शिंदे यांनी सागीतले असुन युवासैनीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे .



