एक रविवार, एक तास’, सारडा नगरी बनवू खास;पिताजी सारडा नगरी

एक रविवार, एक तास’, सारडा नगरी बनवू खास;पिताजी सारडा नगरी
अंबाजोगाई प्रतिनीधी. बालाजी देशमुख –अंबाजोगाई त समजली जाणारी उच्चभ्रू लोकांची सोसायटी त स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी राबवण्यात आला या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक व संचालक यांना पिताजी सारडा नगरी अव्वल बनवुयात असं आवाहन नवीन संचालक मंडळ यांनी केलं आहे.
आणी आसे झाले कि कांही जेस्ट संचालक आणी नगरीचे तरुण तडफदार नवीन नेतृत्व ज्यांच्या कडे आशेच्या किरणासारखे पाहीले जाते आसे आपले चेअरमन मा.संतोषराव राख साहेब आणी त्यांची टिम यांना कल्पना सुचली व कोणताही विचार न करता नगरीच्या गृपवर पोस्ट टाकली कि सुट्टी चा एक तास नगरीच्या स्वच्छते साठी आणि रविवार दिवस ठरला व वेळपण ठरली रविवार सकाळी ८ते ९ ऐक तास आणी पाहाता पाहाता दहा ते बाराजण जमले व स्वच्छते ला सुरुवात झाली . कोणी काय करायचे ते ठरले तो पर्यंत अमितजी वर्मा साहेबांनी झाडु घेतला व झाडायला सुरुवात केली .कोणी झाडले कोणी कचरा उचलला कोणी पाणी मारले व हे पाहुन लहान मुलेही गोळा झाली व कामाला वेग आला .आणी एका जेस्ट नागरीकांनी काम करता करता नास्ट्याची सोय केली .
स्वच्छतेचे काम पुर्ण झाले व सर्व नागरीकांनी भरपेठ मनसोक्त नास्टा खालला.
आज तेथेच मंदिरात मा.चव्हाण सर यांच्या मित्राच्या घरचा एक नवरदेव दर्शनासाठी आला आणि बागेची स्वच्छता व टाप टिपपणा पाहुन ११००रु देणगीची पावती फाडुन गेला.म्हणजे या वरुन आसे लक्षात येते कि कुठे तरी पिताजी सारडा नगरी गृहनिर्माण सोसायटी चे नवीन संचालक आळस झटकून कामाला लागलेले दिसुन येत आहेत. आणी असेच काम करत राहिले तर निश्चित आपली सोसायटी नावा रुपाला येण्यास वेळ लागणार नाही. आशी चर्चा सर्व नागरिकांन मध्ये आहे.
तर दैनिक सुर्योदय शी बोलताना चेअरमन साहेबांनी आसे सांगितले कि आधी आपले घर मग आपल्या बाजुचा परिसर आपली बाग व आपला रोड स्वच्छ ठेवा म्हणजे आपण व आपला परिवार पण निरोगी राहिल. याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे .तरी चेअरमन श्री.संतोषराव राख साहेबांनी सांगितले कि आज पासुन दर रविवारी एक तास नगरीसाठी हा कार्यक्रम चालुच राहानार आहे.



