
सद्गुरू धुळेश्र्वर विद्यालय व लिटिल स्टार पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलन – कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात साजरा..
मंद्रूप येथील सद्गुरू धुळेश्र्वर विद्यालय व लिटिल स्टार पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन – कलाविष्कार 2025 कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द.सोलापूर चे माजी आमदार श्री दिलीपराव माने हे होते तर प्रतिमा पुजन मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री मनोज पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंद्रूप चे सरपंच अनिता कोरे,कृ.उ.बा.समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे,ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक गंगाधर बिराजदार,संत रोहिदास सामा.संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल व्हनमारे, येळेगावचे सरपंच संजीवकुमार लोणारी,युवा नेते प्रथमेश पाटील, मा.सरपंच महादेव नरोणी सर,निंबार्गी गावचे उपसरपंच पीरसाब हवालदार,मंद्रूपचे उद्योगपती सतीश वर्णेकर,चिदानंद मुगळे,आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष निरंजन ख्याडे,तायक्वांडो प्रशिक्षक शिवराज मुगळे,पत्रकार महेश पवार,पत्रकार आमोगसिद्ध लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सुलोचना पाटील आणि मुख्याध्यापिका श्रद्धा कोरे यांनी शाळेचे अहवाल वाचन केले.कोळी गीत,गोंधळ गीत,लोक गीत,अनेक हिंदी मराठी सिनेमातील गाणीवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवर आणि पालकांचे मने जिंकली.यावेळी वर्षभरात विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.”आगामी काळात शाळा उतुंग भरारी घेईल यात काही शंका नाही” असे मत माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब काळे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि आभारही मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद व्हनकोरे सर आणि सुतार मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.



