जाती तोडा समाज जोडा हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र जपणे काळाची गरज- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.31(प्रतिनिधी)ः-आजच्या कलोशीत झालेल्या समाज मनाला एकत्रित करण्याचे काम पारंपारिक काळापासून वारकरी संप्रदायाने केले आहे जातीपातीला थारा न देता सर्व समाज बांधवांना एकाच छत्र छायेखाली आणण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे ॥ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने रचिले हे आवर, मा उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी उभा केलेल्या वारकरी संप्रदायाचा विस्तार संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई आदी संतांनी केला आहे, जाती तोडा समाज जोडा हा वारकरी सांप्रदायाचा मूळ मंत्र जपणे हीच आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे धर्मनाथ बीज निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन प्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित राहून मठाधिपती ह.भ.प.शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गोरक्षनाथ टेकडीच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून आतापर्यंत 9 कोटींची कामे झाली असून मेणार्या काळात रस्ता, फरशी आणि कंपाउंड कामासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, आजच्या काळात संत महतांच्या विचाराप्रमाणे वागण्याची गरज असून संतांच्या कार्यामुळे लोहचुंबकाप्रमाणे माणसे एकत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण काम होऊ लागले आहे. या गडाच्या विकासासाठी सत्ता असो अथवा नसो आपण सतत प्रयत्नशील असून जाणीवपूर्वक विकास कामे करण्यावर आपण भर दिलेला आहे. गडाच्या भक्तांकडून वारंवार होणार्या मागणीचा विचार करून यासाठी आपण प्रमत्न करत असतो मनात भाव ठेवून कुठलेही भक्ती करा गोरक्षनाथ टेकडीचा भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात आहे. वैकुंठवासी किसन बाबा मांनी अखंडपणे सुरू केलेली ही परंपरा मठाधिपती नवनाथ बाबा यांनी कायम ठेवली असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात सप्ताह साजरा करत असतात आणि परिसरातील भक्तांना एकत्रित करून घेतात. या ठिकाणी जात पात धर्म कुठलाही भेद न ठेवता सर्व जाती धर्मातील भाविकांना एकत्रित केले जाते. बीड जिल्ह्याची ही परंपरा मोठी आहे वारकरी सांप्रदाय हे बीड जिल्ह्याचे वैभव असून ते टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. या ठिकाणी असलेल्या रस्त्याची समस्या फरशी आणि कंपाउंड यासाठी प्रस्ताव देऊन तो मंजूर करून आणू असेही ते म्हणाले. यावेळी ह.भ.प.शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज, ह.भ.प.अखंडानंद गिरी महाराज, माउली महाराज वडवणीवर, माजी मंत्री बदामराव पंडित, माऊली महाराज बेदरकर, गंगाधर घुमरे, अरुण डाके, सखाराम मस्के, अरुण लांडे, हनुमान देवकते, नारायण देवकते, दादासाहेब लांडे, बंडू गाडीवान, चंद्रकांत फड, जनार्दन जोगदंड, बाबुराव करांडे, दिनकर लांडे, कांतराव डोईफोडे, सुनील थोरात, रामा भोगे, सोमनाथ माने, ओमप्रकाश खवतड, शाम काकडे, कैलास देवकते, नागेश शिंदे, बंडू लांडे, परमेश्वर थापडे यांच्यासह परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



