
मूकनायक व दर्पण दिनानिमित्त विविध पुरस्काराचे आयोजन
इच्छुकाने प्रस्ताव पाठवावेत-जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब हुंबरे.
गेवराई प्रतिनिधी;-मूकनायक व दर्पण दिनानिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गेवराई येथे विविध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे,तरी दिनांक 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत पुरस्कार इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने आपले प्रस्ताव वेळेत पाठवावेत असे आव्हान महाराष्ट्र पत्रकार संघ बीड जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक संघर्षयोध्दा मुख्य संपादक बापूसाहेब हुंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघ बीड जिल्हा यांच्या वतीने प्रत्येक वर्षी गेवराई येथे मूकनायक व दर्पण दिन निमीत विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी आपन शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय ,सहकार ,सांस्कृतिक, पत्रकार ,संपादक ,इलेक्ट्रॉनिक मीडिया ,वैद्यकीय, उद्योग ,आदर्श सरपंच ,नाट्य, कृषी रत्न व आदर्श माता-पिता आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व्यक्तींना विविध जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे .
तरी पुरस्कार इच्छुक व्यक्तीने आपले प्रस्ताव खालील पत्त्यावर दिनांक 8/2 पर्यंत आपला प्रस्ताव पाठवावा किंवा प्रत्यक्ष येऊन दुपारच्या वेळेत चार ते राञी नऊ पर्यंत गेवराई येथील कार्यालयात येऊन भेट द्यावी. कार्यालयचा पत्ता दैनिक संघर्षयोध्दा सावतानगर तहसील रोड गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड मोबाईल नंबर 96 57 10 27 08,
70 66 10 32 75.



