संपादकीय

तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट व जी. प. प्रा शाळेला  बस सेवा   सुरू

तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट व जी. प. प्रा शाळेला  बस सेवा   सुरू
बीड प्रतिनिधी;- नवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट या शाळेसाठी व जी प प्रा शा तांदळवाडी घाट या दोन्ही शाळेसाठी एसटी बस सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरुवात केली आहे याप्रसंगी चालक  इतापे संतोष रामचंद्र व वाहक  वाघुंबरे विठ्ठल वसंतराव यांचा शाळेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पांचाळ तात्या व प्रमुख पाहुणे म्हणून सुंदर तात्या खोसे ग्रामपंचायत सदस्य शहादेवराव  खोसे डॉक्टर निवांत चव्हाण सर अविनाश राहींज हरी कुमटकर जालिंदरराव भागडे लक्ष्मणराव खोसे विनायकराव काळे रवींद्र विक्रमराव खोसे इत्यादी ग्रामस्थांची उपस्थिती होती
अंधापुरी या ठिकाणी सुद्धा एसटी महामंडळाचे वाहक आणि चालक यांचा ग्रामस्थांनी सरपंच श्री पप्पू जगताप यांनी सत्कार केला सर्व ग्रामस्थ महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या एसटीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून   शाल श्रीफळ देऊन चालक वाहक यांचा सन्मान केला
विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये अतिशय उत्साह दिसून आला तांदळेश्वर विद्यालयांमध्ये कार्यक्रम स्थळी प्रास्ताविकामध्ये  डाके सर यांनी शाळेच्या वेळेचे नियमावली व विद्यार्थ्यांना शिस्तीत एसटीमध्ये चढताना उतरताना पाळावयाची शिस्त या बाबीवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले व  डाके सर यांनी व  क्षीरसागर सर यांनी एसटी महामंडळाचे डीएम डोके साहेब व बनसोडे सर तसेच मनोज जी डावकर उंदरे साहेब या सर्वांचे आभार व्यक्त केले
बस सेवा सुरू करण्यासाठी संस्थेचे सहसचिव युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ योगेश भैय्या क्षीरसागर साहेब यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या सहकार्याने बस सेवा लवकरात लवकर सुरू झाली त्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक  श्याम अरुणराव डाके व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  क्षीरसागर लक्ष्मणराव यांनी डॉ योगेश भैय्या क्षीरसागर साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले व गावकऱ्यांना सुद्धा याची माहिती दिली की भैय्या साहेबांच्या प्रयत्नामुळे बस सेवा सुरू झाली
तांदळवाडी घाट व अंधापुरी घाट येथील ग्रामस्थ विद्यार्थी महिला बंधू भगिनी सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसून आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पांचाळ तात्या यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे सर्व शिक्षकांच्या कामाचे कौतुक करून पुढेही अशीच कामगिरी करा असे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाके श्याम सर मुख्याध्यापक यांनी केले
व आभार श्री वामने कल्याण सर यांनी मानले कार्यक्रमासाठी  पवार शिवाजी सर गणेश काशीद सर श्रीहरी लहाने सर काटवटी सेवक काळे सेवक घोडके युवा प्रशिक्षक त्याचबरोबर जि प प्रा शा तांदळवाडी घाट शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मणराव शिरसागर काटे सर फसले सर खोसे युवा प्रशिक्षक सर उपस्थित होते.
Back to top button