📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द !

 

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता या प्रकरणी सर्व आरोपींना पकडण्यात आले होते. या केसचा आज अंतिम निकाल आला आहे.

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवूरन टाकणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आज आपला अंतिम फैसला सुनावला. हायकोर्टानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं.

आरोपांची शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठानं सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाचं वाचन केलं. हायकोर्टाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे.

Back to top button