📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गड्या हो मी पण तुमचाच समाज बाधव ना ? माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार ? स्व. महादेव मुंडेंचे बॅनर झळकले

गड्या हो मी पण तुमचाच समाज बाधव ना ?
माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार ? स्व. महादेव मुंडेंचे बॅनर झळकले
गड्याहो मी पण तुमचाच समाज बांधव ना ?
माझ्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार ?
-: आव्हान कर्ते :-स्व. महादेव मुंडे-परळी
परळी येथील पिगमी एजंट महादेव मुंडे यांचा ही परळीत खून झालेला असून, मागील काही वर्षांपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी न्यायासाठी संघर्ष करीत आहेत. अनेक चौकश्या झाल्या पण सर्वांनी हात वर केल्याने महादेव मुंडे यांना काही अद्याप न्याय मिळाला नाही. दरम्यान विलास घुले यांची हत्या झाल्यानंतर एक तरुण गेल्याने समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. या घुले कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या मार्गावर आज अचानक महादेव मुंडे यांचे बॅनर झळकले असून त्यात गड्या हो मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी कधी उतरणार रस्त्यावर…? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे माणूस पाहून निर्णय होतात का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. तसेच काही वेळात हे बॅनर मात्र या मार्गावरील बॅनर हटविण्यात आले. याची मात्र जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे
Back to top button