बीड

आ.विजयसिंह पंडित यांनी रस्त्याच्या कामासह नाली बांधकामाची पाहणी केली

आ.विजयसिंह पंडित यांनी रस्त्याच्या कामासह नाली बांधकामाची पाहणी केली
. जिथे जिथे होईल तेवढ्या जागेवर रिंग टाकून झाडे लावण्यासाठी जास्त स्कोप ठेवा, कामे क्वालिटीची करा आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्या कामावर पाणी मारण्यावर जास्त भर द्या अशा सुचना

 बीड (प्रतिनिधी) – आ.विजयसिंह पंडित यांनी आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतिर्थ) ते नगर पालिकेपर्यंत सुरू असलेल्या रस्ता आणि नाली कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, गटनेते फारूख पटेल, नगरसेवक अशफाक इनामदार, सय्यद सादेकुजमा, खय्युम इनामदार, शेख बिलाल, वकील सर, नगरसेवक सय्यद इलियास, भागवत तावरे,बरकत पठाण, सिताई कन्स्ट्रक्शनचे रंजित क्षीरसागर, नितीन जोगदंड आदिंची उपस्थिती होती. यावेळी आ.विजयसिंह पंडित यांनी रस्त्याच्या कामासह नाली बांधकामाची पाहणी केली. जिथे जिथे होईल तेवढ्या जागेवर रिंग टाकून झाडे लावण्यासाठी जास्त स्कोप ठेवा, कामे क्वालिटीची करा आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्या कामावर पाणी मारण्यावर जास्त भर द्या अशा सुचना त्यांनी गुत्तेदाराला दिल्या. दरम्यान रस्त्याच्या कामाची सर्व माहिती दर्शविणारे मोठे बॅनर कामाच्या ठिकाणी लावल्याचे पाहुन आ.विजयसिंह पंडित यांनी नगर पालिकेचे कौतूक केले. प्रत्येक बाब या बॅनरवर दाखवण्यात आली आहे. नागरीकांना याची माहिती घेण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
Back to top button