📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

हिंदू-मुस्लिमनंतर आता महार-मातंग वाद; मुख्यमंत्र्यांवर विकी सदाफुलेंचा आरोप

हिंदू-मुस्लिमनंतर आता महार-मातंग वाद; मुख्यमंत्र्यांवर विकी सदाफुलेंचा आरोप

जामखेड शहरात लाँग मार्चचे स्वागत व भव्य रॅली

जामखेड प्रतिनिधी: अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जाती एकता समितीच्या वतीने बीड ते मंत्रालय, मुंबई असा पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा लाँग मार्च जामखेड शहरात दाखल झाल्यानंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने बीड रोडवरील मार्केट यार्डसमोर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी लाँग मार्चमधील पदाधिकाऱ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

यानंतर शहरातून महापुरुषांच्या जयघोषात तसेच भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीनंतर आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यापासून हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी आणि आता बौद्ध म्हणजेच पूर्वी श्रमाचे महार-मातंग वाद लावून दिला आहे. महार-मातंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमच्यात फाटाफूट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

यावेळी बौद्धाचार्य अशोक आव्हाड, राजन समिंदर, अनिल सदाफुले, सिद्धार्थ साळवे, रत्नाकर सदाफुले, सागर घायतडक, विनोद सोनवणे, अतिश पारवे, मुकुंद घायतडक, दादासाहेब घायतडक, रंजन मेघडंबर, विनोद घायतडक, सचिन सदाफुले, योगेश घायतडक, किशोर कांबळे, अतिश डाडर, अंकुश पुलावळे, प्रमोद सदाफुले, सोनू सदाफुले, अंकल घायतडक, विकी गायकवाड, अक्षय घायतडक तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सौ. सुरेखा सदाफुले,कुसूम साळवे,अरुणा सदाफुले आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button