बीड

मा. आ.भीमराव धोंडे साहेब यांचे तंत्रशिक्षण क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल!

मा. आ.भीमराव धोंडे साहेब यांचे तंत्रशिक्षण क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल!
कडा व पाटोदा येथे दोन नवीन पॉलिटेक्निक महाविद्यालयांना AICTE नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची मान्यता
आष्टी प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरिटेबल संस्थेने कडा व पाटोदा येथे दोन नवीन पॉलिटेक्निक महाविद्यालये सुरू केली आहेत. या दोन्ही महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलामार्फत मागील अनेक वर्षांपासून कृषी, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग, तंत्रनिकेतन, अन्नतंत्रज्ञान, पॅरामेडिकल , कृषी पदविका, दुग्ध व्यवसाय इतर व्यावसायिक शिक्षणाच्या शाखा यशस्वीपणे चालविल्या जात आहेत. त्याच शैक्षणिक परंपरेचा विस्तार करत कडा येथील बाबाजी शैक्षणिक संकुल मध्ये गंगाई पॉलिटेक्निक कॉलेज आणि पाटोदा येथे  धोंडे शैक्षणिक संकुल मध्ये आनंदराव धोंडे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यात आले आहे.
कडा येथील गंगाई पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुढील शाखांना मान्यता मिळाली आहे
1. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
2. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
3. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
4. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स
5. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
या प्रत्येक शाखेस ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता मिळाली आहे .तर पाटोदा येथील  आनंदराव धोंडे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुढील शाखा सुरू करण्यात आल्या आहेत
1. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3. मेकॅनिकल इंजिनिअरिंग
4. सिव्हिल इंजिनिअरिंग
5. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
या प्रत्येक शाखेलाही ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मान्यता प्राप्त झाली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यांसारख्या भविष्याभिमुख अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आपल्या परिसरातच घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण तांत्रिक व व्यवसायिक शिक्षण उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षमपणे पुढे जावे आणि त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात, ग्रामीण भागातील विद्यार्थीही उच्चशिक्षित झाला पाहिजे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
माननीय  संस्थापक अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी व बाबाजी शैक्षणिक संकुल कडा तसेच धोंडे शैक्षणिक संकुल पाटोदा मधील कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपले भवितव्य उज्वल बनवा तसेच
इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित  कॉलेजला संपर्क करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button