बीड

कर्जमाफीच्या जीआरची शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने होळी 

कर्जमाफीच्या जीआरची शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने होळी
बच्चू कडू ने आमदारकीसाठी शेतकऱ्याला धोका दिला:- राजेंद्र आमटे
बीड ( प्रतिनिधी) नागपूरच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये अनेक अशा जाचक अटी लादण्यात आलेले आहेत यामुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत याचा निषेध म्हणून शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने खांडे पारगाव येथे शासनाच्या कर्जमाफी जीआर ची होळी करण्यात आली.
      संपूर्ण शेतकऱ्याला अपेक्षा होती की शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल व शेतकऱ्याला दिलासा मिळेल या हेतूने नागपूर येथे शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमाफीचा आंदोलन करण्यात आलं. या कर्जमाफी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला धारेवर धरण्याकरिता बच्चू कडू यांच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याऐवजी बच्चू कडून स्वतःच्या आमदारकीचा विचार करून शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला व शेतकरी कर्जमाफी आंदोलनामध्ये आमदारकीची दलाली खाऊन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचे काम बच्चू कडू ने करण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाने काढलेल्या कर्जमाफी शासन निर्णयामध्ये 80 ते 90 टक्के शेतकरी हे कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत याचा निषेध म्हणून शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने खांडे पारगाव येथे कर्जमाफी शासन निर्णयाची शेतकऱ्याच्या वतीने होळी करून जाहीर निषेध करण्यात आला व तात्काळ शासनाने कर्जमाफीच्या निर्णयामध्ये ज्या काही अटी शर्ती शेतकऱ्यावर लादलेले आहेत त्या अटी शर्ती बाजूला काढून सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा अशी पद्धतीची मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, माणिक आमटे, सुभाष काळे ,सुभाष सपकाळ, नवनाथ सपकाळ, बबन आमटे, संजय आमटे, प्रदीप आमटे ,भिवाजी धारवाडकर, पिनु आमटे, रवी सपकाळ, प्रकाश काळे, दामोदर आमटे, दिलीप झणझणे, महादेव झणझणे, नवनाथ बुरांडे, हनुमान अवघड, लक्ष्मण आमटे, अर्जुन अवघड, बाळू आमटे आदी उपस्थित होते
Back to top button