बीड
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबद धरुन दोषींविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्याची बसपाची मागणी !

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबद धरुन दोषींविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्याची बसपाची मागणी !
नांदेड (प्रतिनिधी) : नीट परीक्षा पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या मोठ्या प्रमाणात होत असून त्यास जबाबदार धरुन नीटमाफिया शिवराज मोटेगावकर व अन्य दोषींविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
बहुजन समाज पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांनी लातूर येथील नुकत्याच आत्महत्या केलेल्याव नीटच्या विद्यार्थिनी कु. मैथिली सोनवणे तसेच गंगाखेड येथील प्रथमेश मोहन राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मैथिली या विद्यार्थ्यांनीला फक्त ५१.५० टक्के गुण मिळाले होते पण तिचा न पेपर चांगला गेला होता. पेपरफुटीमुळे ती भयभीत झाली होती.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील १८ वर्षीय प्रथमेशने नांदेड येथे नीट परीक्षा दिली होती, ती रद्द झाल्याने तो भयभीत झाला होता. या तणावात त्याने विष पिऊन आत्महत्या केली. “नीट परीक्षेत मी आता पास होत नाही” असे म्हणत त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे आपल्या आईला सांगितले.
राज्यात होत असलेल्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी आत्महत्येस शिवराज मोटेगावकर आणि सर्व भ्रष्ट कोचिंग क्लासेस जबाबदार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यांनी जो धुडगूस घातला याकडे शासन प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व संशयित आरोपींविरुद्ध तात्काळ खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी येथे संपन्न झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या बैठकीतून करण्यात आली.m
या बैठकीचे सूत्रसंचलन बसपाचे जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे यांनी केले तर प्रास्ताविक नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर यांनी केले. बैठकीत जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम इंगोले, जिल्हा प्रभारी लोकेश कांबळे, सटवा सोनकांबळे, शंकरराव कापसे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोठेवाड, बालाजी पल्लेवाड यांनीही आपले विचार मांडले.
रेल्वे स्टेशन व जागोजागी लावलेले आरसीसी व अन्य सर्व कोचिंग क्लासेसचे फलक/ बॅनर्स तात्काळ हटविले पाहिजेत, पेपर फूट प्रकरणी संशयित सर्व कोचिंग क्लासेस शासनाने कायमचे बंद करावेत, निटची परीक्षा पद्धती रद्द करण्यात यावी, सर्व शाळा महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी सिस्टीम लावण्यात यावी अशाही मागण्या बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.


