बीड
शिवसैनिकांनो जिंकण्याच्या शर्यतीत उतरा, तुम्हाला जिंकवण्याची जबाबदारी पक्षाची- खा. डॉ. श्रीकांत शिंदे

शिवसैनिकांनो जिंकण्याच्या शर्यतीत उतरा, तुम्हाला जिंकवण्याची जबाबदारी पक्षाची- खा. डॉ. श्रीकांत शिंदे
*बीड-माजलगाव मतदारसंघातील शिवसंवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!*
================
बीड, प्रतिनिधी – महाराष्ट्रासह मराठवाड्यात उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे. बीड जिल्ह्यात शिवसेनेला आगामी काळात मोठी संधी आहे. लोकांच्या मनात आजही शिवसेना आहे. त्यामुळे तळागाळात जाऊन काम करा, स्वतःची ताकद निर्माण करा. आपण मागणारे नाही तर देणारे आहोत. ज्याच्याकडे ताकद आहे, त्याला पक्ष नक्की ताकद देतो. शिवसैनिकांनो, जिंकण्याच्या शर्यतीत उतरा; तुम्हाला जिंकवण्याची जबाबदारी पक्षाची आहे, असे दमदार प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. बीड-माजलगाव मतदारसंघातील शिवसंवाद बैठकीत ते बोलत होते. राज्यभर सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधील हॉटेल निलकमल येथे ही महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत तळागाळातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी बोलताना खा. शिंदे यांनी बीडमधील शिवसेनेच्या मतदानाचा उल्लेख करत, मागील निवडणुकांमध्ये बीड मतदारसंघात शिवसेनेला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळेच पक्षाने मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे बीड जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते बीडमध्ये सक्रियपणे काम करत आहेत, हीच पक्षाने दिलेली ताकद आहे, असे सांगितले. बैठकीत विधानसभा क्षेत्रनिहाय संघटनात्मक आढावा, तालुकानिहाय माहिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे नियोजन, संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा, नेमणुका, बी.एल.ए. यादी आणि प्रशिक्षण यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला.
दरम्यान बैठकीत विधानसभा क्षेत्रनिहाय संघटनात्मक आढावा, तालुकानिहाय माहिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे नियोजन, संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा, एस.ई.ओ. नेमणुका, बी.एल.ए. यादी आणि प्रशिक्षण यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी बीड-माजलगाव मतदारसंघाचा सर्वंकष कार्यअहवाल सादर केला. यावेळी त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांचे संघटनात्मक काम, स्थानिक विकासाचे मुद्दे तसेच आगामी राजकीय परिस्थितीबाबत आपले मत मांडले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला.
या बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा बीड जिल्हा संपर्कमंत्री भरतशेठ गोगावले, खा. संदीपान भुमरे पाटील, आमदार हेमंत पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंदजी परांजपे, शिवसेना सचिव संजयजी माशीलकर, संजय लाखे, मराठवाडा विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन, बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोजजी शिंदे, शिवसेना उपनेत्या संगीता ठोंबरे,विधानसभा संपर्काप्रमुख बाप्पुसाहेब मोरे, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासह विविध अंगीकृत संघटनांचे अजीमाजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शेतकरी सेना, अल्पसंख्यांक आघाडी, ओबीसी व्हीजेएनटी सेल, डॉक्टर सेल, विधी सेल, वाहतूक सेना, शिव उद्योग सेना, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
—–
*चौकट-*
अनिलदादांकडे पक्षाचे विशेष लक्ष आहे – खा. डॉ. श्रीकांत शिंदे
बैठकीदरम्यान शिवसैनिकांना संबोधित करताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. “अनिलदादा जगताप यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसह पक्षाचे विशेष लक्ष आहे म्हणूनच शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंत्री भरतशेठ गोगावले, शेजारच्या मतदार संघातील खा. संदीपन भूमरे, आमदार हेमंत पाटील आणि आमच्या ठाण्याचे मनोजजी शिंदे आम्ही संपर्कप्रमुख पदी दिले आहेत. यामुळे अनिलदादांकडे संपूर्ण पक्षाचे पूर्ण लक्ष आहे. कोणतीही चिंता करू नका. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्या. योग्य वेळी योग्य न्याय मिळेल आणि पक्ष योग्य जबाबदारी निश्चितच सोपवेल, असे स्पष्ट आश्वासन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.



