ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मुंबईत ‘वृक्षारोपण मोहिम’ ; अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थित

हरित व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी वृक्षारोपण मोहिमा महत्वाच्या
मुंबई, दि. २५ —
डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘वृक्षारोपण मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले. या उपक्रमात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले.
या मोहिमेप्रसंगी जलसंपदा मंत्री जयकुमार रावल, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला, सेहर भामला, शाळेचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
शहर हिरवेगार ठेवण्यासाठी मोहिमा महत्त्वाच्या
—–
वृक्षारोपणानंतर बोलताना मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “वाढत्या शहरीकरणात आपल्या शहराला हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक झाड म्हणजे हजारो लोकांना ऑक्सिजन. डी. वाय. पाटील स्कूल आणि भामला फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी
विद्यार्थ्यांना आवाहन करताना त्या म्हणाल्या,”फक्त झाड लावून थांबू नका, तर त्याचे संगोपनही करा. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड दत्तक घेऊन मोठे करावे. चला, आपण सर्वांनी मिळून अधिकाधिक झाडे लावूया आणि त्यांचे संगोपन करून येणाऱ्या पिढीला सुरक्षित भविष्य देऊया,” असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.
देशी प्रजातींच्या विविध रोपांची लागवड
——
यावेळी पंकजाताई मुंडे व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात आणि लगतच्या परिसरात वड, पिंपळ, कडुनिंब, करंज, बहावा अशा देशी प्रजातींच्या विविध रोपे लावण्यात आली. भामला फाउंडेशनतर्फे पुढील तीन वर्षे या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली आहे.
••••



