सांधेदुखी, कंबरदुखीच्या रुग्णांसाठी सुवर्णसंधी; बीडमध्ये विशेष अस्थिरोग शिबिराचे आयोजन

सांधेदुखी, कंबरदुखीच्या रुग्णांसाठी सुवर्णसंधी; बीडमध्ये विशेष अस्थिरोग शिबिराचे आयोजन
बीड (प्रतिनिधी):
गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, पाठदुखी तसेच मणक्यांच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे रविवार, दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत विशेष भव्य अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व संत आदर्श ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशन यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात अहमदनगर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन धोत्रे व त्यांची अनुभवी टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.
या शिबिरात गुडघेदुखी, सांधेदुखी, हात-पाय बधिर होणे, चालताना त्रास होणे, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्यांचे विकार, जुने फ्रॅक्चर तसेच सांधे झिजणे अशा विविध आजारांवर तज्ज्ञांकडून सविस्तर सल्ला व उपचार नियोजन करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण गुडघा व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यल्प दरात फक्त ₹६५,००० मध्ये गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून, अपात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांची एक्स-रे तपासणी अत्यल्प दरात फक्त ₹२५० मध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांना डॉक्टरांकडून MRI करण्याचा सल्ला दिला जाईल, त्यांच्यासाठी MRI तपासणी विशेष सवलतीच्या दरात फक्त ₹१७५० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तपासणी शुल्क केवळ ₹१०० ठेवण्यात आले असून, बीड जिल्ह्यासह परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
**संपर्क :**
मो. ९८५००७७३६१ / ८२६२००९०९१



