शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे उल्लेखनीय यश

शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे उल्लेखनीय यश
४ विद्यार्थिनींना २०० पेक्षा अधिक गुण ; शिक्षकांच्या अनमोल मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक
जामखेड : रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, येथील विद्यार्थिनींनी इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ९० विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी ११ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून १ विद्यार्थिनीने २०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. राधिका बाबासाहेब घोलप हिने २२८ गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच अनुष्का संजय कुमटकर (१७२), वैदेही विनय गर्जे (१६८), प्रणिती नितीन फरांडे (१६२), श्रेया उमेश साळुंखे (१५८), अनुष्का जालिंदर माने (१४२), अदीबा फिरोज खान (१३६), अनुष्का ज्ञानदेव काळे (१३६), समृद्धी परमेश्वर पाचंगणे (१३६), अश्विनी हरिश्चंद्र जगताप (१३०) व स्वानंदी भोर (१३०) यांनी यश संपादन केले.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ७४ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी २१ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून ४ विद्यार्थिनींनी २०० पेक्षा अधिक गुण मिळवले. वेदिका दत्तात्रय घुमरे हिने २५४ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अलीझा अफसर शेख (२२०), तेजश्री संदीपान सांगळे (२१४) आणि साईगौरी हरिश्चंद्र पवार (२००) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
तसेच मुधा दिपक शेळके (१९६), स्वरा मारुती उबाळे (१९२), सानिका संतोष कदम (१८८), सोनम उद्धव जगदाळे (१८४), समृद्धी नवनाथ महारनवर (१८०), आर्या भूषण रेळेकर (१७४), तनया बाळकृष्ण निकम (१७०), अश्मिरा आबेद जमादार (१६८), अनुजा भाऊसाहेब यादव (१६६), शरयू योगेश तुपेरे (१६६), श्रेया गणेश गवसणे (१६६), वेदशी पांडुरंग वराट (१६६), संध्या शरद सपकाळ (१६४), वेदिका गणेश जगताप (१५६), तन्वी अविनाश गर्जे (१५४), समृद्धी हनुमंत माने (१४८) आणि समृद्धी दत्तात्रय वीर (१४६) यांनी यश संपादन केले.
या यशस्वीतेसाठी इयत्ता आठवी विभाग प्रमुख गणेश जाधव [मराठी] हनुमंत नागरे [गणित] शंभूदेव बडे [इंग्रजी] विलास पवार [बुद्धिमत्ता] वैशाली नवले [गणित]हनुमंत नागरे[ मराठी] प्रियंका पवार [इंग्रजी] सिमा शेळके [बुद्धिमत्ता] यांनी विद्यार्थिनींना परिश्रमपूर्वक प्रशिक्षण दिले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल स्कूल कमिटी सदस्य प्रा.मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,प्रा.कुंडल राळेभात
,कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर,पर्यवेक्षक संजय हजारे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.



