बीड

अद्याप UDID कार्ड काढले नसले तरीही तहसीलच्या दिव्यांगांच्या कोणत्याही पगारी थांबविल्या जाणार नाहीत – डॉ.संतोष मुंडे

अद्याप UDID कार्ड काढले नसले तरीही तहसीलच्या दिव्यांगांच्या कोणत्याही पगारी थांबविल्या जाणार नाहीत – डॉ.संतोष मुंडे

UDID कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

परळी (प्रतिनिधी): दिनांक १६ मे

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन अशा विविध योजना  यशस्वीरीत्या सुरू आहेत.

यापैकी विशेष सहाय्य अनुदान योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड बंधनकारक करणारे परिपत्रक काढले होते.

अशा या परिपत्रकामुळे सद्यस्थितीत अनेक दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड नसल्यामुळे त्यांना त्यांचे दिव्यांग अनुदान मिळण्यासाठी अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन शासनाने UDID कार्ड काढण्याची मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२६ केली आहे .

तसेच त्यांच्याकडे अद्यापही UDID कार्ड नाही त्यांचे तहसीलच्या कोणतेही अनुदान(पगार)थांबवले जाणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने घेतला आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे

अशा या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना नवीन UDID कार्ड काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकते सहकार्य केले जाणार आहे अशी.

राज्यातील कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहू नये यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली आणि ह्या शासन निर्णयाबद्दल माजी कृषिमंत्री मा.आ.धनंजय मुंडे तसेच ना.पंकजाताई मुंडे व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री ना.अतुल सावे यांचे आभार मानले.

Back to top button