बीड

महिलांचा हक्क नाकारण्याची किंमत विरोधकांना मोजावी लागेल – ना. पंकजाताई मुंडे

*महिलांचा हक्क नाकारण्याची किंमत विरोधकांना मोजावी लागेल – ना. पंकजाताई मुंडे

*ठाण्यात पत्रकार परिषद ; महिला आरक्षणाला विरोध हे अत्यंत निषेधार्ह*

मुंबई दि. २१ —
महिला आरक्षण विधेयक नाकारले गेले, तेव्हा देशातील प्रत्येक महिलेला प्रताडित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. महिलांचा हक्क नाकारणे हे अत्यंत निषेधार्ह असून काँग्रेससह सर्व विरोधकांना याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला. काँग्रेस पक्ष देशाला स्वतःची मालमत्ता समजतो, हीच त्यांची मानसिकता आहे’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठाणे येथे भाजप विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या. भाजप नेत्या माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष  संदीप लेले तसेच समीरा भारती, स्वप्नाली साळवी, वंदना डोंगरे, वनिता बोथपगारे आदी महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
​’नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करणाऱ्या काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या भूमिकेचा ना. पंकजाताईंनी यावेळी निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी देशातील कोट्यवधी महिलांच्या आकांक्षांचा आणि हक्कांचा घोर अवमान केला आहे.​वर्षानुवर्षे महिला आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विरोधकांनी संसदेत या विधेयकाविरोधात भूमिका घेऊन आपली महिलाविरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलत असताना, विरोधकांचा हा अडथळा देशातील जनता कधीही विसरणार नाही असं त्या म्हणाल्या.

*भाजप जोरदार लढा देईल*
——-
महिला सक्षमीकरण आणि लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबध्द आहे, महिलांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी या महिलांविरोधी शक्तीविरूध्द आम्ही जोरदार लढा देऊ असं त्या म्हणाल्या. काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी आणि डीएमके या पक्षांनी केवळ घटनादुरुस्ती किंवा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांनाच विरोध केला नाही तर त्यांनी भारतातील लाखो माता-भगिनी आणि मुलींचा विश्वासघात केला आहे असा आरोप ना. पंकजाताईंनी केला.

Back to top button