कन्या विद्यालयाची गुणवत्ता उंचावण्यात हजारे यांचे मोलाचे योगदान : सुरेश भोसले

कन्या विद्यालयाची गुणवत्ता उंचावण्यात हजारे यांचे मोलाचे योगदान : सुरेश भोसले
पर्यवेक्षक संजय हजारे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात
जामखेड : प्रतिनिधी
श्री संजय हजारे यांनी संस्थेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावत कन्या विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय कार्य केले. पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले,असे मत स्कूल कमिटीचे सदस्य मा. सुरेश भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, जामखेड या शाळेचे पर्यवेक्षक श्री.संजय रामचंद्र हजारे यांच्या सेवा पुर्ती सत्कार समारंभा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील तसेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे सदस्य श्री.सुरेश भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नवनाथ बोडखे (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग) उपस्थित होते.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य श्री. हरीभाऊ बेलेकर, श्री. प्रकाश सदाफुले, श्री. विनायक राऊत, श्री. प्रा. कुंडल राळेभात, श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य श्री. भगवान मडके, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर, माजी मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, शिक्षक नेते श्री. शिवाजीराव ढाळे तसेच संस्थेचे सर्व आजी-माजी शिक्षक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे बोलताना म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेमध्ये जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ निश्चितच मिळते.पर्यवेक्षक संजय हजारे यांचे कार्य त्याचे उत्तम उदाहरण आहे, श्री.नागेश विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना संजय हजारे यांचे काम मला जवळून पाहता आले. मराठी विषयावर त्यांचा उत्तम अभ्यास असून संस्थेबद्दल त्यांची निष्ठा व ध्येयधोरणांप्रती बांधिलकी उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर यांनी सांगितले की, श्री.संजय हजारे यांनी शाखेसाठी दिलेले योगदान तसेच विद्यार्थिनींना शिस्त, स्वच्छता व गुणवत्तेविषयी मार्गदर्शन मिळत होते. प्रशासनाला त्यांचे नेहमीच सहकार्य मिळत होते.
पर्यवेक्षक संजय हजारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,संस्थेने दिलेल्या संधीमुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली. या प्रवासात सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनींच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले, याचे समाधान आहे. पुढील काळातही विद्यालयाची प्रगती अशीच सुरू राहावी.
यावेळी प्राचार्य श्री.भगवान मडके, स्कूल कमिटी सदस्य श्री.विनायक राऊत, ज्येष्ठ शिक्षक श्री. मोहन यादव,शिक्षक श्री.ज्ञानेश्वर शेटे आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कन्या विद्यालय व श्री.नागेश विद्यालयातील सर्व शिक्षक / शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंभूदेव बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव सरकुंडे यांनी केले.



