📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीवर्धनमध्ये ‘वसंतोत्सव २०२६’चा भव्य जल्लोष; २२ व्या वर्धापन दिनाचे दिमाखदार आयोजन

श्रीवर्धनमध्ये ‘वसंतोत्सव २०२६’चा भव्य जल्लोष; २२ व्या वर्धापन दिनाचे दिमाखदार आयोजन

श्रीवर्धन: कोकणातील सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी देणारा ‘वसंतोत्सव २०२६’ आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा श्रीवर्धनचा २२ वा वर्धापन दिन यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार असून, संपूर्ण शहरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री दत्त मंदिर सभागृह, पेशवे आळी येथे हा बहारदार सोहळा पार पडणार आहे.
यंदाच्या वसंतोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीवर्धनच्या इतिहासात प्रथमच तीन प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत —ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर असोसिएशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद—एकत्र येत हा सांस्कृतिक मेळावा आयोजित करत आहेत. या अनोख्या एकत्रिकरणामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक बंध अधिक दृढ होणार असल्याचे मानले जात आहे.
कार्यक्रम ‘मौज, मजा, मस्ती आणि मनोरंजन’ या संकल्पनेवर आधारित असून, विविध वयोगटातील सदस्यांसाठी खास सादरीकरणांची रेलचेल असणार आहे. कविता वाचनातून साहित्यिक अभिव्यक्ती, सुरेल गाण्यांमधून संगीताची मेजवानी, विनोदी किस्से आणि फनी गेम्समधून हास्याची उधळण, तर नृत्य सादरीकरणातून रंगतदार वातावरण निर्माण होणार आहे. स्थानिक कलाकारांसह सदस्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.
या सोहळ्यासाठी शहरभर तयारीला वेग आला असून  कार्यक्रम नियोजनासाठी विशेष नियोजन करण्यात  आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून, सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे.
कोमसाप श्रीवर्धन शाखेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने या कार्यक्रमाचे बारकाईने नियोजन केले असून, तिन्ही संघटनांच्या सदस्यांनी तसेच श्रीवर्धनकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक वसंतोत्सवाला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करताना सांस्कृतिक परंपरा, एकोप्याची भावना आणि कलागुणांचा उत्सव अशा तिहेरी संगमाने ‘वसंतोत्सव २०२६’ हा केवळ कार्यक्रम न राहता, श्रीवर्धनच्या सामाजिक जीवनातील एक संस्मरणीय पर्व ठरणार आहे.
Back to top button