बीड

एमआयडीसी पैठण पोलिसांचा धडाका; ५०० किलो गोमांस जप्त

एमआयडीसी पैठण पोलिसांचा धडाका; ५०० किलो गोमांस जप्त
बालानगरात गुप्त धाड; चार आरोपी जेरबंद, १.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
किरण काळे
पैठण:
एमआयडीसी पैठण पोलिसांनी बालानगर परिसरात टाकलेल्या धाडीत मोठा अवैध कत्तलप्रकरण उघडकीस आणत तब्बल ५०० किलो गोवंशाचे मांस जप्त केले. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विजेच्या वेगाने हालचाल करत बालानगर येथील शेतावर छापा टाकला. बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेली गोवंशाची कत्तल आणि मांस विक्रीचा प्रकार प्रत्यक्षात उघड झाला. पोलिसांच्या अचानक धाडीने आरोपींमध्ये एकच गोंधळ उडाला.
कारवाईदरम्यान सुमारे ५०० किलो गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ७० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले.
या प्रकरणी गणी सांडू शेख, महमूद सत्तार शेख, मुजाहीद गणी शेख व मुस्तकीम गणी शेख (सर्व रा. बालानगर, ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली.
Back to top button