खासदार निलेश लंके यांच्याकडून अंजलीताई ढेपे यांचा सत्कार

खासदार निलेश लंके यांच्याकडून अंजलीताई ढेपे यांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी :
सामाजिक कार्यातून जामखेड तालुक्यात ठसा उमटवणाऱ्या महारूळी गावच्या माजी सरपंच अंजलीताई लक्ष्मणराव ढेपे यांची शासनाच्या जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) च्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली असून या पार्श्वभूमीवर जामखेड दौऱ्यावर आलेले अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव ढेपे यांच्या निवासस्थानी भेट देत अंजलीताई ढेपे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात, प्रा. संजय वराट, नगरसेवक राजेंद्र गोरे, ॲड.हर्षल डोके,युवा नेते संभाजी राळेभात, प्रवक्ते डॉ. कैलास हजारे, संजय डोके, अमोल लोहकरे, संदीप (आण्णा) गायकवाड, उदयसिंह पवार, दीपक घायतडक, दत्तात्रय डिसले, पिनू मुळे, हनुमंत मोरे, आकाश घागरे,डॉ. प्रणव राळेभात आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) ही समिती केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन व समन्वय साधणारी महत्त्वाची समिती आहे. या समितीचे अध्यक्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असून सहअध्यक्ष म्हणून अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके काम पाहतात.



