बीड

अहिल्यानगर महानगर पालिकेत नागरगोजे झाले स्विकृत नगरसेवक

  अहिल्यानगर महानगर पालिकेत
नागरगोजे झाले स्विकृत नगरसेवक
बीड(प्रतिनिधी)अहिल्यानगर महानगर पालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी बाबुसेठ नागरगोजे यांची निवड झाली आहे. त्यांच्यासह पाच स्विकृत नगरसेवकांच्या नावांची महापौर ज्योती अमोल गाडे यांनी काल गुरुवारी घोषणा केली. बाबुसेठ नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील मानूर या गावचे सुपुत्र आहेत. तसेच उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी गरुडझेप घेतलेली आहे. त्यांच्या या निवडीचे अहिल्यानगरसह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे.
बाबासाहेब संतोष नागरगोजे (बाबुसेठ) यांनी नुकतीच अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक लढवली होती. दुर्दैवाने त्यांचा फक्त 44 मतांनी पराभव झाला होता. त्यांचा हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. सर्वात महत्वाचे म्हणजे अहिल्यानगरचे लोकप्रिय आ.संग्रामभैय्या जगताप यांना या पराभवाची मनामध्ये खंत होती.कारण जगताप यांच्या नेतृत्वाखाली बाबुसेठ तसेच त्यांचे बंधु लिंबासेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या नागरगोजे बंधुंनी संग्राम भैय्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पहिल्यांदा पक्षीय राजकारणात प्रवेश केला. मात्र त्यांचा पराभव झाल्याने आ.जगताप यांच्या मनात खंत होती. अखेर त्यांनी स्विकृत नगरसेवकाच्या निमित्ताने नागरगोजे बंधुंना दिलेला शब्द खरा करुन दाखवला. नागरगोजे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकी दादासाहेब जगताप,रेवननाथ दगडू पवार यांची तर भाजपच्या वतीने विशाल नाकाडे, रविंद्र बारस्कर यांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. महापौर सौ.ज्योती अमोल गाडे, मनपा आयुक्त यशवंतराव डांगे यांच्या उपस्थितीत बाबुसेठ नागरगोजे यांना नगरसेवक पदाच्या निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
Back to top button