गेवराईची माती सामाजिक मोती पिकवणारी: दत्ता बारगजे
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रत्नांना सोबत घेवून काम करणार : गिताभाभी पवार
सामाजिक धान्य बँकेच्या राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कारांचे वितरण
गेवराई
गेवराईच्या मातीमध्ये सामाजिक कार्यात काम करणारे मोती पिकवण्याची ताकत आहे आणि हे मोती समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करत असून आगामी पाच वर्षात गेवराई शहरात असे पाच दहा हजार समाजसेवक निर्माण होणार असल्याचे मत इन्फंटचे दत्ता बारगजे यांनी गेवराई येथील सामाजिक धान्य बँकेच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सेवारत्न पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी केले. समाजसेवेचा वसा घेतलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दि. २३ फेब्रुवरी रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला.
संघर्ष सामाजिक धान्य बँक आयोजित पुरस्कार सोहळा जि.प.प्राथमिक शाळा गेवराई येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आनंदग्रामचे दत्ता बारगजे व प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा गीताभाभी पवार, गटशिक्षणाधिकारी प्रवीणकुमार काळम पाटील, नायब तहसीलदार संजय सोनवणे, रामकुमार राव अग्रवाल, प्रीती संतोष गर्जे, कर्ण तांबे यांची लाभली होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात दत्ता बारगजे यांनी संघर्ष धान्य बँकेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे अनेक सामाजिक कामांचे कौतुक केले. तसेच बीड जिल्ह्यात सर्वात जास्त सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक गेवराई तालुक्यात असल्याने आपल्याला या बाबीचा खुप अभिमान आहे आणि या लोकांना विश्वासात घेवून काम करणार असल्याचे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या नगराध्यक्षा गिताभाभी पवार यांनी सांगितले. संत गाडगे बाबा जयंतीचे निमित्त साधुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यां रत्नांना सेवारत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यामध्ये माधवराव पवार,धनंजय सुलाखे,नामदेव चौधार, भारत चव्हाण, विकास घोडके, योगेश महाराज गायके,आप्पासाहेब महानोर, शितल साखरे, ज्ञानेश्वर पिंगळे, लातूर पॅटर्न क्लासेस गेवराई व गेवराई तालुका व्यापारी महासंघ यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचा परिचय समाजसेवक सुभाष काळे यांनी दिला व राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सुरेश भोपळे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत शिवाजी झेंडेकर तसेच आभार डॉ. संजय पांढरे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज करपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष सामाजिक धान्य बँकेचे संचालक बाळासाहेब गावडे, भारत साळुंखे. सुरेश नवले, भागेश्वर काळे यांनी सर्वत्र नियोजन पूर्णत्वास नेले. यावेळी सेवारत्न पुरस्कार प्राप्त मंडळीकडून संघर्ष धान्य बँकेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्वच मंडलीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विशेषत: सुभाष काळे यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. तसेच आपली या पुरस्कारासाठी निवड झाल्याने अणखी जबाबदारी वाढली असल्याने सामाजिक काम करण्यास बळ व प्रेरणा मिळाली असल्याने अणखी जोमाने काम करणार असल्याच्या भावना यावेळी पुरस्कृतांकडून व्यक्त करण्यात आल्या.