बीड

विकास कामांच्या माध्यमातून गेवराई मतदार संघाचा कायापालट करणार – आ. विजयसिंह पंडित

विकास कामांच्या माध्यमातून गेवराई मतदार संघाचा कायापालट करणार – आ. विजयसिंह पंडित
===============
*विकासकामांचा झंझावात ; १७ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भव्य शुभारंभ*
===============
गेवराई, दि.२१ (प्रतिनिधी)  गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेने भरभरून आशिर्वाद दिले, आता या मतदार संघाच्या सर्वांगिन विकासाची जबाबदारी आमदार म्हणून सर्वस्वी माझी आहे आणि ती पूर्णपणे पार पाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. विरोधकांकडे विकासाचे कसलेही व्हिजन नाही केवळ ते लोकांचा बुध्दिभेद करत आहेत, शिवछत्र परिवार हा काम करणारा आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात वैयक्तिक लाभाच्या कामासह ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आपल्या भागात आणून गेवराई विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणार आहोत. जे गरजेचे आहे ती विकासाची कामे प्रामाणिकपणे करायची आहेत, तेंव्हा विरोधकांना थारा न देता आपल्या भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला साथ व आशिर्वाद द्या असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई विधानसभा मतदार संघात १७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभा निवडणुकीतनंतर दिड वर्षांत कोट्यावधी रुपयांची कामे आपल्या मतदार संघासाठी खेचून आणली असून त्यातील १७ कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. त्यामध्ये मौजे कुक्कडगाव ता. बीड येथे सिंदफणा पात्र पूरसंरक्षण भिंत बांधणे – २ कोटी ७४ लक्ष रू, जि प प्रा शाळा खोली बांधकाम करणे – १० लक्ष रु., मौजे चव्हाणवाडी ता. बीड येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे १५ लक्ष रु तसेच मौजे औरंगपूर, ता.बीड येथे पुर संरक्षक भिंत बांधणे – २४८.४३ लक्ष रु., मौजे ईटकुर, ता.गेवराई येथे पुर संरक्षक भिंत बांधणे – २४४.२१ लक्ष रु., मौजे राजापूर, ता.गेवराई येथे विविध विकास कामे करणे – १४६ लक्ष रु. तसेच श्री क्षेत्र पांचाळेश्वर, ता.गेवराई येथे तिर्थक्षेत्र विकास कामे करणे – ७९०.३२ लक्ष रु. अशा विकास कामांचा समावेश आहे.
  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन्नाथ काळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जयदिप औटी, बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, गेवराई बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, माजी जि.प.सदस्य गणपतराव डोईफोडे, माजी सभापती पांडुरंग कोळेकर, माजी उपसभापती डॉ.आसाराम मराठे, माजी उपसभापती सोमनाथ माने, माजी सभापती मुजीब पठाण, तांडा समृध्दी योजनेचे विभागीय सदस्य सुंदरसिंग राठोड, आत्मतिर्थ देवस्थाने अध्यक्ष रविंद्र कोठी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, आपल्या भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही आपल्या विचाराची असली पाहिजे. गेवराईसोबतच आता बीड मतदार संघाची जबाबदारीही शिवछत्र परिवारावर लोकांनी टाकली आहे. येणाऱ्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना मग त्या वैयक्तिक लाभाच्या असो अथवा ग्रामीण भागाच्या विकासाच्या असोत त्या  सर्व राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आपण विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता विकासकामाच्या बाजूने उभे रहा, विरोधक केवळ जाणीवपूर्वक विरोध करत आहेत, एैन निवडणुकीच्या तोंडावर लोकांचा बुध्दिभेद करून विकास कामांच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत, त्यांना थारा देऊ नका. सकारात्मक दृष्टीने काम करण्यासाठी सहकार्य करा, येणाऱ्या काळात शासनाच्या सर्व विकास योजना पूर्णपणे राबविण्याची ग्वाही आ.विजयसिंह पंडित यांनी यावेळी दिली.
  याप्रसंगी सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले, उपसभापती श्रीहरी पवार, गणेश तोडकर, वचिष्ट कुटे यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक कैलास नलावडे, रवि रसाळ, सरपंच जितेंद्र बोबडे, विकास रकटे, बंडू परदेशी, ह.भ.प.सुंदरसिंह महाराज, चेअरमन चंद्रकांत जाहेर, भानुदास दिंडे, त्रिंबक ढेंगळे, सचिन घोडके, कुंडलिक देवकते, भागवत ढेंगळे, गणेश जाहेर, भगवान कोटेकर, रंजित कोटेकर, सुनिल ढेंगळे, बबलू सिराम, बंडू जाहेर, विनायक मासाळ, लहू लोखंडे, डिगांबर डोंबाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button