📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लिंबागणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी :– डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
:– डॉ. गणेश ढवळे
—
लिंबागणेश (दि. २१): महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी घटना चिखला गाव येथे घडली असून शिवस्मारक उभारणीच्या वादातून मराठा समाजातील बांधव व महिलांवर दगडफेक व अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेत संजीवनी वाघ यांच्यासह अन्य महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. स्त्रीसन्मान व न्यायाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या विचारांना ही घटना काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी केली. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी निदर्शने करण्यात आली.

निदर्शनादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून प्रशासनाने निष्पक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थितांना संयम राखत लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले.

यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ आप्पा गिरे, कल्याण वाणी, बाळकृष्ण थोरात, भगवान मोरे, अ‍ॅड. गणेश वाणी, दामोदर थोरात, महादेव कुदळे, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, अशोकराजे वाणी, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, नाना वाणी,महावीर जाधव, अक्षय नाईकवाडे, सुरज ढास,संजय पावले, रामदास मुळे, केशव गिरे, गहिनीनाथ वाणी, राजेभाऊ पाटील, रामा वाणी, भगवान लगास आदी उपस्थित होते.

Back to top button