📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

व्हावळे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅंथर  व्हावळे कुटुंबासोबत- मराठवाडा महासचिव गौतम आगळे 

व्हावळे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅंथर  व्हावळे कुटुंबासोबत- मराठवाडा महासचिव गौतम आगळे
प्रशासनाच्या दारात व ढिसाळ कारभारामुळे दीपक व्हावळे यांचा बळी, कुटुंबाला न्याय देण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची-जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड
परळी प्रतिनिधी
पोलीस व्हायचे स्वप्न मनामध्ये घेऊन सोळाशे मीटरची धाव मोठ्या जिद्दीने पूर्ण करून पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपक भास्कर   व्हावळे रा.मांडखेल ता.परळी वै.जि. बीड या तरुणाचा दुर्दैवी पोलीस भरतीच्या मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असून त्याच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
   ऊसतोड मजुराचा मोठा मुलगा पोलीस भरतीचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरला खरा परंतु त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी,त्यांना धीर देण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते नेते समाजसेवक यांची मांडेखेल गावात वर्दळ वाढली.
परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन व प्रशासनातील अधिकारी अथवा राजकीय क्षेत्रातील मंत्री आमदार खासदार यांनी अद्यापही भेट न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मांडेखेल येथील  व्हावळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज  भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा महासचिव गौतम आगळे,बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड तालुकाध्यक्ष माणिकराव बनसोडे शहराध्यक्ष धम्मदीप रोडे यांनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन करून त्यांना धीर देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा महासचिव गौतम आगळे म्हणाले की,  जोपर्यंत व्हावळे  कुटुंबाला न्याय भेटत नाही, शासनातर्फे आर्थिक मदत भेटत नाही आणि आपल्या दुसऱ्या मुलाला शासन सेवेत घेण्यात येत नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅंथर आपल्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सोबत आहे असा विश्वास देण्यात आला आहे.
तर बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की, दीपक व्हावळे यांचा प्रशासनाच्या दारात व हलगर्जीपणा व ढिसाळ कारभारामुळे बळी गेला असून आज त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे याची सामाजिक नैतिक व आर्थिक जबाबदारी ही शासन व प्रशासनाची असून त्यांनी तात्काळ यात लक्ष घालून व्हावळे  कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे, शहराध्यक्ष धम्मदीप रोडे. मुंबई विभागातील उपजिल्हाधिकारी महादेव किरवले साहेब, लिंबाजी व्हावळे, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
Back to top button