बीड
शून्य गुंतवणुकीच्या आधुनिक शेतीतून शाश्वत उत्पन्नाची सुवर्णसंधी!

शून्य गुंतवणुकीच्या आधुनिक शेतीतून शाश्वत उत्पन्नाची सुवर्णसंधी!
ग्लोबल विकास ट्रस्टचा आधार; AU Small Finance बँकेची आर्थिक साथ
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):पारंपरिक शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न, वाढते उत्पादनखर्च आणि अनिश्चित बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. मेहनत प्रचंड, परंतु उत्पन्न मात्र मर्यादित… या वास्तवामुळे ग्रामीण अर्थचक्राला खीळ बसत आहे. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज ठरत आहे. मात्र यासाठी लागणारे भांडवल हेच अनेक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे अडथळे ठरते. या पार्श्वभूमीवर ग्लोबल विकास ट्रस्टने पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे. केळी आणि तुती लागवडीसारख्या उत्पन्नक्षम पिकांसाठी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना AU Small Finance बँकेच्या माध्यमातून कर्जरूपाने सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आधुनिक, नियोजनबद्ध आणि बाजारपेठेच्या दृष्टीने सक्षम शेतीकडे वळण्याचा मार्ग तर सुकर झाला आहे त्याबरोबरच शून्य गुंतवणुकीची आधुनिक शेती करता येणार आहे.
जलनायक मयंक गांधी यांचे स्वप्न म्हणजे पारंपरिक शेतीच्या मर्यादांमधून शेतकऱ्यांची मुक्तता करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. त्याच दृष्टीने मराठवाड्यातील शेतीव्यवस्थेचा अभ्यास करून, स्थानिक गरजा ओळखून आणि समस्यांवर ठोस उपाय शोधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोखरा योजनेत समाविष्ट गावांतील शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. केळी लागवडीसाठी २ एकर क्षेत्र मर्यादेपर्यंत कमाल २ लाख २० हजार रुपयांपर्यंत, तर तुती लागवडीसाठी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंत विना तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जप्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली असून, लागवडीपासून काढणीपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य ग्लोबल विकास ट्रस्टकडून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उत्पन्नवाढीचा आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क करा, माहिती आणि सहकार्य मिळवा
पोखरा योजनेत समावेश असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी ग्लोबल विकास ट्रस्ट आणि AU Small Finance बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत पण शेतकरी सर्व गावांमध्ये केळी लागवड करू शकतात. केळी लागवडीसाठी जास्तीत जास्त 2 लाख 20 हजार कमाल मर्यादा पर्यंत तर तुती लागवड करण्यासाठी पोखरा योजनेअंतर्गत गावातील शेतकऱ्यांसाठी 3 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज सुरुवातीला देण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी शिवलिंग रुद्राक्ष (8591314682), मुक्तेश्वर कडभाने (8591304662) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



