बीड

अजितदादांची आकस्मिक एक्झिट मनाला चटका लावणारी,आहे राज्यातील एक उमदा महाराष्ट्राचा लोकनेता हरपला : प्रतिक-दादा पाटील

अजितदादांची आकस्मिक एक्झिट मनाला चटका लावणारी,आहे राज्यातील एक उमदा महाराष्ट्राचा लोकनेता हरपला : प्रतिक-दादा पाटील
*ईश्वरपूर दि. २९ (प्रतिनिधी)*
       महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मित विमान अपघातात जाणे राज्या तील जनतेच्या मनाला चटका लावणारे आहे. आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य गेल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागाच्या हितासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्य माणसांच्या सुख- दुःखाशी समरस झालेला महाराष्ट्राचा लाडका दादा,महाराष्ट्राचा लोकनेता हरपला आहे,अशा शब्दात स्व.अजितदादा पवार यांना उरुण ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी स्व.दादांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.
     राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतिकदादा पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,प्रा.शामराव पाटील,उप नगराध्यक्ष खंडेराव जाधव,गटनेत्या प्रा.अरुणा देवी पाटील,राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,सुभाषराव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,अरुण कांबळे,महेश अशोकराव पाटील,निवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने,प्रदेश सदस्या कमल पाटील,शहराध्यक्ष पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
     प्रतिकदादा पाटील म्हणाले, दादांचे आकस्मित जाणे वेदनादायक आहे. स्व.दादा व साहेबांनी दीर्घ काळ पक्ष संघटना व मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. राज्यातील सामान्य माणसाच्या हिता साठी अहोरात्र कष्ट घेणारे,जे मनात आहे,ते बेधडक बोलणारे,अत्यंत वक्तशीर दादा आज आपल्यात नाहीत,हे पटत नाही.
      आनंदराव मलगुंडे म्हणाले,कालचा दिवस महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. दादांनी तब्बल ४५ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करीत राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे.
      विजयराव पाटील म्हणाले,दादांनी ग्रामीण भागाचे नेतृत्व करीत ग्रामीण भागाचा विकास, शेती,सहकार क्षेत्राला मोठी गती दिली आहे.
     शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, मात्र दादांनी कुठेही कटुता येऊ दिली नाही. यावेळी प्रा.शामराव पाटील,खंडेराव जाधव,प्रा.अरुणादेवी पाटील, दादासाहेब पाटील,अरुण कांबळे,महेश पाटील, सुस्मिता जाधव,सुनीता देशमाने,पुष्पलता खरात,कमल पाटील,शंकराव चव्हाण यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
      माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,संचालक हणमंत माळी,अनिल पावणे,माजी सभापती शैलेश सुर्यवंशी,नगरसेवक सुनिल मलगुंडे, संग्रामसिंह पाटील,सचिन कोळी,लताताई कुर्लेकर,कांचन कोळेकर,सचिन हांडे,युवक शह राध्यक्ष दिग्विजय पाटील,अभिजित कुर्लेकर, अभिमन्यू क्षीरसागर,अभिजित पाटील,राहुल नागे,दत्ता फल्ले,आदिनाथ चौधरी,संजय खवळे, रविंद्र वाघमोडे,सूर्याजी पाटील,संजय रानमाळे, विशाल सुर्यवंशी, अभिजित शिंदे,विशाल माने, राजेंद्र बाणेकर,बालाजी निकम,मालन वाकळे, मनिषा पेठकर,सुनंदा साठे यांच्यासह जेष्ठ,युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button