सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशनमध्ये माता-पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशनमध्ये माता-पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी: तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फौंडेशन चे स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज,साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, सनराईज् इंग्लिश स्कूल येथे दि. १७ जानेवारी रोजी माता-पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अंजली मिलिंद जिवडे, तर प्रमुख पाहुणे सौ. शितल भोंडवे या उपस्थित होत्या,मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पालक मेळाव्याचे प्रास्ताविक सौ. अर्चना गिरमे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अनेक माता-पालकांनी मनोगतातून शाळेबाबतच्या अपेक्षा व सूचना मांडल्या. पालक मेळाव्यानंतर मातांसाठी संगीत खुर्ची, बुक बॅलन्स, रनिंग रेस, उखाणे आदी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते ,या खेळांमध्ये मातांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमात आनंदाची रंगत भरली. संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड-भोरे यांच्या हस्ते विजेत्या मातांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास संचालक प्रा. तेजस भोरे,भाऊसाहेब भोईटे,अंजली कात्रजकर,विद्या डोंगरे,सानिया सय्यद,कदम मॅडम,पूनम तुपेरे आदी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभिषण भोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. तनुजा सांगळे यांनी केले.



