बीड

बीड पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार बीड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना वेळेवर धान्य वितरण होत नाही :विशाल इंगोले 

बीड पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार बीड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना वेळेवर धान्य वितरण होत नाही :विशाल इंगोले
बीड प्रतिनिधी ; केंद्र सरकार च्या वतिने स्वस्त धान्य दुकाना मार्फत पंतप्रधान गरिब कुटुंब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य दिले जाते परंतु सध्या बीड पुरवठा विभागाचा कारभार का हम करे सो कायदा प्रमाणे चालत आहे एक तर दुकानदार यांना 3 महिन्याच्या ट्रांजेक्षण प्रमाणे धान्य दिले जाते तर नियतन काढण्यासाठी ऐवढा वेळ काढू पणा का केला जातो परमिट सुद्धा वेळेवर तयार केले जात नाही दर महिन्याला 2/3 तारखेला परमिट गोदाम ला पाठवले जातात त्या नंतर गोदाम व्यवस्थापक व वाहतूक व्यवस्था पुरवणारे कंत्राट दार हे आपल्या सवडीने दुकानदार यांना धान्य वाटप करण्यासाठी गाड्या उपलब्ध करून धान्य वितरण करतात ही पुर्ण प्रक्रिया करण्यासाठी दर महिन्याला अनेक दुकानदार यांना धान्य हे 25/28 तारखेपर्यंत दुकानात पोहच होते परिणामी दुकानदार यांच्या कडे धान्य वाटप करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो त्यात मशिन सर्व्हर डाऊन होते परिणामी पुरवठा विभाग मुदतवाढ देण्यात यावी यासाठी जास्त मणावर घेत नाही किंवा शासनास पत्र व्यवहार करत नाही या मुळे मुदतवाढ न आल्याने 1 तारिख ऊजडली कि मशिन बंद होऊन मागिल महिन्याचे धान्य लैप्स होऊन पुढील महीन्याचे धान्य वितरणासाठी डाटा ऐतो गेल्या 4/5 महिन्यांपासून अनेक कार्ड धारक हे धान्य घेण्यापासून वंचित राहत आहेत या वर मा.जिल्हाधीकारी साहेब यांनी तातडीने ठोस उपाययोजना करून कार्यवाही करावी अशी मागणी शिवक्रांती सेना संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष विशाल इंगोले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
Back to top button