बीड

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालक महोत्सव स्पर्धेत दिनानाथ बालकाश्रमची नेत्र दीपक कामगिरी

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालक महोत्सव स्पर्धेत दिनानाथ बालकाश्रमची नेत्र दीपक कामगिरी

बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग अंतर्गत शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकाविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दि. 16 ते 18 जानेवारी 2026 रोजी केज येथील ग्रामलोक विकास मंडळ उमरगा (खु) संचलित पांडुरंग बालकाश्रम येथे भव्यदिव्य विविधांगी स्पर्धा घेण्यात आल्या.या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व बालकाश्रमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे, लांब उडी बुद्धिबळ, कॅरम आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष व कौतुकास्पद बाब म्हणजे दीनानाथ बालकाश्रमच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी व खो-खो या दोन्ही सांघिक खेळात प्रथम पारितोषिक पटकावण्याचा मान मिळविला. बुद्धिबळ स्पर्धेत चि. चांगन सौरभ सतीश याने प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये चव्हाण ज्ञानेश्वर प्रभू याने द्वितीय क्रमांक तर 100 मीटर धावणेमध्ये राठोड अर्णव रोहिदास यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची सांघिक व वैयक्तिक खेळाची तयारी चव्हाण बी.एल.सर यांनी घेतली. या बक्षीस वितरण प्रसंगी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई दीपक वंजाळे, केज नगरपंचायतचे गटनेते हरुणभाई इनामदार, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीता बनसोड, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, जिल्हा महिला बालविकासचे अधिकारी मनोज ससे, परिविक्षा अधिकारी मंगेश जाधव हे मान्यवर उपस्थित होते. वरील मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव पवार, सचिव अतुलभाऊ पवार, मागदर्शक सुशीलभाऊ पवार, प्राचार्य खंदारे सर, प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक शिंदे सर तसेच आश्रम शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व बालकाश्रमच्या सर्व कर्मचारी वृंदांनी विजयी खेळाडूंचे व त्यांचे मार्गदर्शक चव्हाण बी.एल. सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button