बीड

समाजपरिवर्तनाची मशाल सावित्रीबाई फुले यांनी पेटवली – लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी

समाजपरिवर्तनाची मशाल सावित्रीबाई फुले यांनी पेटवली – लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी

जामखेड नगर परिषदेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जामखेड l प्रतिनिधी
आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जामखेड नगर परिषद कार्यालयात भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना चिंतामणी म्हणाल्या की,सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वंचित घटक, विशेषतः महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले करून सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी गटनेते नगरसेवक तात्याराम पोकळे,नगरसेवक संजय काशिद,श्रीराम डोके,पोपट राळेभात,प्रशांत राळेभात,वसिम सय्यद,प्रा.विकी घायतडक,अशोक शेळके,राजेंद्र गोरे,मोहन पवार,इस्माईल सय्यद, हर्षद काळे तसेच नगरसेविका नंदा होळकर,संगीता भालेराव व भाजपा नेते मनोज कुलकर्णी,मोहन (मामा) गडदे, प्रविण होळकर, वसिम शेख,सुरज भालेराव आदी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button