बीड
बीड नगर परिषदेत आरेफ खान यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्याची

बीड नगर परिषदेत आरेफ खान यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्याची
आमदार विजय सिंह पंडित शेख मुजीब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे मागणी….
बीड नगर परिषदेमध्ये आरेफ खान यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले आरेफ खान यांनी नगर परिषदेच्या अलीकडील घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी लीड मिळविन्या करीता नियोजन बध कार्यच नव्हे तर अनेक नगर सेवकांना निवडून येण्यात आरेफ खान यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे नगर परिषदेत सकारात्मक निकाल लागल्याचेही सांगण्यात येत आहे.
आरेफ खान हे *सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांचा अनुभव आणि योगदान* *लक्षात घेता* तसेच मताधिक्य मिळालेले पेठ बीड विभागात पुळच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमदार विजय राजे पंडित यांना असेच मताधिक्य रहावे याकरिता, ग्राउंड वर दांडगा जनसंपर्क आणि नियोजन असणारे व समाज कार्य करणारे , आरेफ खान यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देणे योग्य ठरेल, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या मागणीमुळे बीड शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नगर परिषदेच्या संबंधित निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



