बीड
ना.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘एक पेड बाप के नाम’ अंतर्गत बऱ्हाणपूर येथे भव्य वृक्षारोपण गणेश लांडे

ना.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘एक पेड बाप के नाम’ अंतर्गत बऱ्हाणपूर येथे भव्य वृक्षारोपण गणेश लांडे
बीड प्रतिनिधि:-
एक झाड देशासाठी, एक झाड भविष्यासाठी’ हा संदेश देत आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बीड तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य वृक्ष लागवड कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. भाजप नेते गणेश लांडे (जिल्हा सरचिटणीस, बीड) आणि भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते.लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड बाप के नाम” (एक झाड वडिलांच्या नावावर) लावून हा पर्यावरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला बऱ्हाणपूर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील असंख्य नागरिकांनी आपापल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सन्मानार्थ मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे संगोपन व जतन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.या प्रसंगी बऱ्हाणपूरचे सरपंच गोरख शिंदे, बऱ्हाणपूरचे पोलीस पाटील रावसाहेब क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य सुनील क्षीरसागर, दिनकर पाटील लांडे, महादेव शिंदे, ज्ञानेश्वर लांडे, राजेश क्षीरसागर, गोरख लांडे, भागवत शिंदे, संतोष क्षीरसागर, मोहन लांडे, विक्रम लांडे, कल्याण क्षीरसागर, अशोक जवादे, गणेश हजारी, दूर्वा भांगे, बाबासाहेब लांडे, गणेश चिरके आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बऱ्हाणपूर आणि परिसरातून भाजपच्या या पर्यावरणपूरक मोहिमेचे मोठे कौतुक होत आहे.



