बीड
लिंबागणेश येथे महाबोधी विहार मुक्तीसाठी निदर्शने ; महाबोधी बौद्ध विहार कायदा १९४९ रद्द करून बौद्ध विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध भिक्खुंच्या ताब्यात द्यावे :- डॉ.गणेश ढवळे

—-
लिंबागणेश:- ( दि.१३) बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी बौद्ध विहार कायदा बीटीएमसी अक्ट १९४९ रद्द करून महाबोधी बौद्ध विहाराचे संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध भिक्खुंच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१३ गुरूवार रोजी सकाळी पंचशील नगर येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून गावातील प्रमुख चौकातुन घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. गावच्या मुख्य प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली. बिहार मधील महाबोधी बौद्ध विहार जागतिक वारसा स्थान म्हणून ओळखले जाते. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पुर्णज्ञान (संबोधी /बुद्धत्व ) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध बनले व’ बुद्ध ‘म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले.तथागत गौतम बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली.तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.त्यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खु आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात.मात्र आजही या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथील बौद्ध विहाराचा ताबा सनातन ब्राह्मणांच्या ताब्यात असून ज्या रुढी परंपरांना गौतम बुद्धांनी नाकारले तीच कर्मकांडे येथे सुरू आहेत.बिहार येथील बौद्धगया महाबोधी महाविहार कायदा बीटीएमसी ऍक्ट १९४९ त्वरित रद्द करून सदरील बौद्ध विहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे. बिहार राज्यात उपरोक्त कायद्याप्रमाणे बौद्धगया येथील महाबोधी महाविहार यांचे संपूर्ण व्यवस्थापन ब्राह्मण पुजाऱ्याकडे असून हा कायदा १९४९ मध्ये बिहार राज्य अंतर्गत स्थापित झालेला असून संविधानिक अधिकारानुसार (अनुच्छेद २५ आणि २६ )प्रमाणे आणि संविधानाच्या अनुच्छेद १३ विरोधात आहे हा विरोधाभास संपुष्टात आणून संविधानाचे बुज राखून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ,
,भिमराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव,राजाभाऊ गिरे ,बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ,श्रीहरी निर्मळ, अँड . गणेश वाणी,दादा गायकवाड,बीड उपजिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना आरूण निर्मळ, जितेंद्र निर्मळ, उमेश थोरात, दादा थोरात, नितीन थोरात, श्रीकांत आवसरे, नितिन निर्मळ, नाना निर्मळ, सिद्धार्थ निर्मळ, अमोल वक्ते , तुकाराम गायकवाड, प्रमोद निर्मळ, बबन सोनावणे, भालचंद्र गिरे, गणपत तागड, सचिन गिरे, आदि सहभागी होते.