बीड
जामखेडच्या राहुल उगले यांची नाशिक समन्वयकपदी निवड

जामखेडच्या राहुल उगले यांची नाशिक समन्वयकपदी निवड
जामखेड प्रतिनिधी – जामखेड येथील युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव माननीय राहुल उगले यांची नाशिक शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या समन्वयक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी राहुल उगले यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढील वाटचालीस तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत युवक काँग्रेस अधिक सक्षम व संघटित करण्यासाठी योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.



