श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज आळंदी (देवाची ) या प्रशाळेत पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर

श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज आळंदी (देवाची ) या प्रशाळेत पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर
पुणे / आळंदी:-श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, आळंदी या प्रशालेत शुक्रवार दि. 11/07/2025 रोजी इयत्ता 5 वी ते 12 वी च्या वर्गांची शासकीय नियमानुसार पालक सभा आयोजित करून पालक – शिक्षक संघाची कार्यकारणी निवड करण्यात आली. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रत्येक वर्गाच्या पालकांमधून पालक-शिक्षक संघाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. त्यामधून पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्रेनिक अशोक क्षीरसागर तर सहसचिव पदी रावसाहेब अच्युतराव ताठे आणि सचिवपदी शिक्षिका यमुना कुऱ्हाडे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
यावेळी पालकसभेत अभ्यासक्रम, शालेय कामकाज, सहशालेय उपक्रम, विविध समित्या आणि त्यांची कार्ये इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. पालक – शिक्षक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणीची सभा झाली. सूर्यकांत मुंगसे यांनी पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून विद्यालयात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती सभेस दिली. सन 2024 – 25 च्या पालक – शिक्षक संघाचे सचिव संजय कंठाळे यांनी गतवर्षीच्या वार्षिक अहवालाचे वाचन सभेसमोर केले. यावेळी गतवर्षाच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा शेळके यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था महाराष्ट्रात विश्वसनीय व नावाजलेली संस्था आहे आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व घटक खूप परिश्रम घेतात असे मत व्यक्त केले. तसेच सहसचिव मनीषा केदार यांनी सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे खजिनदार डॉ. दिपक पाटील यांनी नवनिर्वाचित पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शेवटी संस्था सचिव अजित वडगांवकर यांनी संस्था व शाळा यांच्या प्रगती बाबत माहिती देत संस्थेच्या प्रगतीमध्ये पालक – शिक्षक संघाचे खूप मोठे योगदान व सहकार्य असल्याचे सांगितले. इथून पुढेही सहकार्य व मदतीची अपेक्षा व्यक्त करत नवीन शिक्षक पालक संघास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माऊलींच्या पसायदानाने सभेची सांगता झाली.
तसेच शिक्षक पालक संघ स्थापनेबरोबरच माता पालक संघाची ही स्थापना करण्यात आली. यामध्ये माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी मनीषा केदार व सहसचिव पदी सुरेखा लोहोर यांची तर सचिवपदी शिक्षिका अनुराधा खेसे यांची निवड करण्यात आली.



