बीड

आंतरराष्ट्रीय नेतृत्व’ म्हणत प्रा.राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

आंतरराष्ट्रीय नेतृत्व’ म्हणत प्रा.राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

मतदारसंघापेक्षा बाहेरच्या राजकारणातच रस?

जामखेड प्रतिनिधी : कर्जत/जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे.आमदार रोहित पवार हे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत,असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना जनतेत निर्माण झाल्याचे म्हटले.

प्रा. राम शिंदे म्हणाले की,कर्जत/जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे अवघ्या ६२२ मतांच्या फरकाने निवडून आले. ते या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले, तरी त्यांचे लक्ष स्थानिक प्रश्नांपेक्षा राज्याबाहेरील बैठका आणि दौऱ्यांकडे अधिक असल्याचे दिसते.

बारामतीतील बैठका, तसेच कर्नाटक, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथील राजकीय दौऱ्यांचा उल्लेख करत प्रा.शिंदे यांनी, महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात बैठक घेण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र, स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे अपेक्षित असते, असे सांगितले.जनतेच्या मनात मतदारसंघाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झाली आहे. भविष्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता आमदार रोहित पवार सैरभैर झाल्याचे स्पष्ट दिसते, असा दावा देखील त्यांनी केला.

Back to top button