बीड
शनी अमावस्या निमित्त लाखो भाविकांनी घेतले शनि महाराजांचे दर्शन

शनी अमावस्या निमित्त लाखो भाविकांनी घेतले शनि महाराजांचे दर्शन
—————————— ——
श्रीक्षेत्र राक्षसभुवन ; शनि महाराजांच्या जयघोषाने परीसर दणदणला
—————————— ——
गेवराई प्रतिनिधी
भारतातील साडे तिन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज देवस्थानाचे विशेष महत्त्व असुन ते प्रसिध्द देवस्थान आहे. तर शानिवार दि.१६ मे रोजी शनी अमावास्या निमित्त याठिकाणी राज्यासह परराज्यातून भाविकांनी शुक्रवारी मध्यरात्री पासुनच शनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी शनि महाराज कि जय अश्या जोरदार घोषणांनी परीसर दणाणून गेला होता.
गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षसभुवन येथे शनीच्या साडे तिन पिठापैकी एक मुख्य पिठ असून शनिवारी शनि अमावास्या निमित्त शनी महाराजांच्या दर्शनासाठी हजारोच्या भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी शनीभक्तांनी शिस्तबद्ध पध्दतीने रांगेत उभा राहून दर्शन घेतले. तसेच यावेळी बीड, गेवराई, चकलंबा, उमापुर सह तलवाडा येथील पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
@ चौकट :-
भारतातील साडे तिन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे शनि अमावस्या निमित्ताने भाविकांनी शनि महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी होती. लाखो भाविकांनी शनि महाराजांचे दर्शन घेतले आहे. तसेच या ठिकाणी पानफुल, नारळ, तेल , सुप्रसिद्ध पेढे व रेवडी सह खाऊवाल्यांचे दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले होते. तर शनी अमावस्या निमित रूद्र अभीषेक , शनि शांति ,शनिजप ,नवगृह जप तसेच अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मंदीरात मोठी गर्दी होती.
– ओंकार अशोकराव पाठक
श्रीक्षेत्र शनि महाराज देवस्थान, राक्षसभुवन



