बीड
छत्रपती मल्टीस्टेट समोर ठेवीदाराची गळफास घेवुन आत्महत्या

छत्रपती मल्टीस्टेट समोर ठेवीदाराची गळफास घेवुन आत्महत्या
गेवराई (प्रतिनिधी):- छत्रपती मल्टीस्टेट गेवराई शाखे समोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बीड जिल्ह्यातील संस्था चालकांनी ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे विविध संस्था चालकांवर दाखल झाले आहेत.
असे असताना गेवराई येथिल नामांकित असलेली छत्रपती मल्टीस्टेट देखिल अडचणीत आली आहे हीच बँक ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. पैसे देऊ सांगत तारखेवर तारीख देत आहे.
यामुळे ठेविदारांना बॅंकेत चक्रा माराव्या लागत आहेत.
असे असताना गेवराई तालुक्यातील खळेगाव येथिल सुरेश आत्माराम जाधव वय ४२ वर्ष यांचे छत्रपती मल्टीस्टेट मध्ये ठेवी ठेवलेल्या होत्या दि.१७ मंगळवार रोजी ते आपल्या पत्नीला घेवून गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट मध्ये ठेवी बाबत रक्कम मागणी करण्यासाठी बॅकेत गेले होते जाधव व त्यांच्या पत्नीला पैसे मिळाले नाहीत म्हणून जाधव व त्यांची पत्नी बॅकेत मुक्कामी राहिले.
त्यांच्या पत्नीसह अन्य दोन तीन महिला ठेविदार बॅक मध्ये तर सुरेश जाधव हे बॅकेच्या बाहेर थांबले दि.१७ रोजी मध्ये रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि बॅके समोर गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असुन मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे घटनेमुळे गेवराई मध्ये खळबळ उडाली आहे.



