शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नगरसेवक गुलचंद अंधारे यांच्या वतीने फराळाचे वाटप

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नगरसेवक गुलचंद अंधारे यांच्या वतीने फराळाचे वाटप
जामखेड – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज, ३० सप्टेंबर, जामखेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ व ८ (सध्या ६) मध्ये भक्तांसाठी उपवास फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच नगर परिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य समितीचे सभापती तथा नगरसेवक गुलचंद हिरामण अंधारे यांच्या वतीने राबवला गेला.
उपवासाच्या प्रसंगी भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि नगरसेवक अंधारे यांनी उपस्थितांचा उत्साह वाढविला. या उपक्रमाद्वारे भक्तांना उत्सवाच्या काळात पोषणयुक्त अन्न उपलब्ध करून देण्याबरोबरच धार्मिक व सामाजिक भावना जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नगरसेवक अंधारे यांनी सांगितले की, नवरात्र हा उत्सव केवळ धार्मिक नाही, तर समाजातील एकात्मतेचे आणि संस्कृतीच्या जतनाचे प्रतीक देखील आहे. या उपक्रमातून प्रभागातील सर्व भाविकांना आनंद मिळावा हीच आमची प्राथमिकता आहे.



