बीड
तणावपूर्ण जीवनात अध्यात्माची गरज – राजेंद्र मस्के वरवटीत अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.

तणावपूर्ण जीवनात अध्यात्माची गरज – राजेंद्र मस्के
वरवटीत अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.
बीड प्रतिनिधी :
“हरी नाम ही मानव जीवनाला संजीवनी देणारी दिव्य शक्ती आहे. गावोगावी आयोजित होणारा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सामूहिक भक्तीचा पवित्र यज्ञ असून त्यातून समाजात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते, सौहार्दाचे वातावरण तयार होते आणि मानव जन्माचा खरा अर्थ उमगतो,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.
लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील वरवटी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. हभप माऊली महाराज मंझरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली.
सप्ताहाच्या निमित्ताने गावात सात दिवस हरिनामाचा अखंड गजर, भजन-कीर्तन, हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. ग्रामस्थांसह वारकरी भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी पुढे बोलताना मस्के म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत अध्यात्माचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. हरिनाम सप्ताहासारखे उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देतात. हरिनामाच्या स्मरणातून मन शुद्ध होते, विचार निर्मळ होतात आणि परस्परांमधील भेदभाव कमी होऊन बंधुभाव वृद्धिंगत होतो.
ते पुढे म्हणाले, “सहकार्य, साधेपणा, परस्पर स्नेह आणि सामूहिक भक्ती या मूल्यांवर आपण चाललो तर समाजातील राग, मत्सर आणि वाद आपोआप नाहीसे होतील. परिणामी समाजात शांतता, प्रेम आणि आपुलकी वाढेल. अशा वातावरणात जीवन अधिक आनंदमय होईल आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थाने ‘विठ्ठल सुख’ अनुभवता येईल.”
सप्ताहाच्या सांगता प्रसंगी कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास गावातील नागरिक, महिला-पुरुष, वारकरी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,