बीड

साहिल काझी यांची राज्य राखीव पोलीस बलात निवड

साहिल काझी यांची राज्य राखीव पोलीस बलात निवड

गफ्फारभाई पठाण यांच्याकडून साहिल काझीचे अभिनंदन

जामखेड प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांचे भाचे तथा पेडगाव (ता. श्रीगोंदे) येथील रहिवासी साहिल मोहसीन काझी यांची राज्य राखीव पोलीस बलात निवड(एस.आर.पी.एफ.) पोलीस गट क्रमांक ७, दौंड येथे निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेतकरी कुटुंबातील साहिल काझी यांनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून त्यांच्या निवडीमुळे पेडगाव तसेच पाटोदा गरडाचे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

त्यांच्या या यशाबद्दल माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी समाधान व्यक्त करत साहिलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील सेवाकार्यातही ते उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Back to top button