पिताजी सारडा नगरीत लाईनमन डे उत्साहात साजरा; वीज योद्ध्यांना मानाचा मुजरा.

पिताजी सारडा नगरीत लाईनमन डे उत्साहात साजरा; वीज योद्ध्यांना मानाचा मुजरा.
अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख दि. ४ मार्च :
देशभरात आज लाईनमन डे उत्साहात साजरा करण्यात आला. वीज वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या लाईनमन कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध ठिकाणी सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पिताजी सारडा नगरी गृहनिर्माण संस्था चे अध्यक्ष श्री.संतोष राख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई चे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष श्री.नंदकिशोर मुंदडा (काकाजी) तसेच सिमा मुंडे मँडम, गोविंद मुंडे साहेब,तारळकळ साहेब, व नगरीचे जेस्ट संचालक टेकाळे महाराज उपस्थित होते .व सोसायटीतील सर्व रहिवासी हजर होते.
काकाजी नी लाईनमन चे आजच्या काळात किती म्हत्व आहे या विषयी माहिती दिली .
या वेळी सुर्यकांत बंडगर सर ,आबांड सर ,अमितजी वर्मा यांनी थोडक्यात लाईनमन विषयी विचार मांडले. संतोष राख सर यांनी म्हणाले कि माझ्या पंधरा वर्षात ऐवढा मोठा लाईनमन डे म्हणजे सत्काराचा कार्यक्रम कधी पाहिला नाही. ते स्वतः लाईनमन आसल्यामुळे त्यांनी लाईनमन च्या आडचणी व व्यथा मांडल्या.
पुढील लाईनमन चे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.संतोष राख, सचिन कटारे ,विठ्ठल थोरात,
बालाजी अंबाड ,राजाभाऊ शिंदे ,
विष्णू मुंडे, दयानंद कावळे ,महेश मुंडे ,विजय लाटे,प्रशांत शिंदे, अमोल गवळी ,सीमा मुंडे मॅडम, गोविंद मुंडे साहेब ,तारळकळ साहेब.
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लाईनमन कर्मचाऱ्यांमुळेच नागरिकांना अखंडित वीज मिळते. वादळ, पावसाळा किंवा तांत्रिक बिघाडाच्या प्रसंगी खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची जबाबदारी ते पार पाडतात.
भारतमध्ये ४ मार्च हा दिवस अनेक ठिकाणी लाईनमन डे म्हणून पाळला जातो. या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रमही राबवले जातात.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी लाईनमन हे खऱ्या अर्थाने “वीज योद्धे” असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला सलाम केला. समाजाने त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व लाईनमन बांधवांना लाईनमन डे निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
हया कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन गृहनिर्माण संस्था चे संचालक श्री .विनायक चव्हाण सर यांनी केले व हा कार्यक्रमाचे नियोजन श्री .परमेश्वर होळकर साहेब यांनी केले व यांना
श्री चाफेकर साहेब, अमित वर्मा यांनी सहकार्य केले .



