बीड

प्रभाग क्रमांक आठ मधुन उच्च विद्याविभूषित डाॅ.प्रशांत गायकवाड जामखेड नगर परिषद साठी इच्छुक उमेदवार.

प्रभाग क्रमांक आठ मधुन उच्च विद्याविभूषित डाॅ.प्रशांत गायकवाड जामखेड नगर परिषद साठी इच्छुक उमेदवार.

सुशिक्षित तरूणांनो एकत्र येऊ या! राजकारणातून समाजकारण करू या..

जामखेड प्रतिनिधी:-जामखेड शहरातील नामवंत शिलादिप हाॅस्पीटलचे संचालक डॉ.प्रशांत गायकवाड हे येणा-या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधुन इच्छुक आहेत याच प्रभागात त्यांचे हाॅस्पीटल असुन या माध्यमातून नागरिकांना डॉ प्रशांत गायकवाड आरोग्य सेवा देत आहेत.

गेली अनेक वर्षापासून आरोग्यसेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांची तपासणी शिबीरे तसेच मोफत उपचार शिबीरांच्या माध्यमातून सेवा देत असल्याने शहरासह त्यांचा तालुक्यात मोठा दांडगा जनसंपर्क आहे.

सुशिक्षित तरूणांनी एकत्र येत समाजाच्या उन्नतीसाठी वज्रमूठ बांधुन शहराचा सर्वांगीण विकास करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे जामखेड शहर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे रस्ते, वीज, पाणी आरोग्य, स्वच्छता अशा मुलभूत सुविधांचाही आभाव शहरात जाणवत आहे .
त्यामुळे शहराच्या विकासासाठी राजकारण हे माध्यम असून त्यामुळे सर्व सुशिक्षित तरूणांनी पुढे येऊन राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आ.रोहित पवार व खा. निलेश लंके हे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असुन विकासाचे व्हिजन असणारे नेते आहेत आ. रोहित पवारांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत आणि आ रोहित दादा आपल्या तरुण तडफदार युवकांचा आयडाॅल असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली तरूणांची फळी राजकारणात एकत्र करून जामखेड शहराचा विकास घडवु या अशी भावना डॉ प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button