बीड
स्व.संतोष देशमुख, उमेश दळवी नंतर आता तोहिद खानचाही क्रुरतेने जीव घेतला

परळीत मुस्लिम द्वेषातून तोहिद खानची हत्या करणार्या मारेकर्यांच्या घरावर बुलडोजर चालवा – शेख मुजीब
बीड, (प्रतिनिधी):- परळी येथील अफजल उर्फ तोहिद केरातीखान पठाण या 36 वर्षीय तरूणाची अतिशय निर्घृणपणे आणि क्रुरतेने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे तोहिद खानचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ टाकून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. एवढेच नव्हे तर तोहिद खानचा मृतदेह आढळल्यानंतर एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल झाली. त्यामध्ये मारेकरी स्वत: मुसलमानाला मारल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहे. अतिशय अवमानजनक भाषा त्यामध्ये वापरल्याचे दिसून येत आहे. सदरील प्रकार अतिशय गंभीर असून थेट जातीचं नावं घेवून अत्यंत अमानुषपणे एका तरूणाची हत्या होत आहे. यावरून जिल्ह्यात पोलिसांचा किती धाक आहे हे देखील स्पष्ट होत आहे. एसपी साहेब, बुलडोजर केवळ आरोपी असणार्या मुसलमानांच्या घरावरच चालवण्यासाठी आहे का? याप्रकरणातील मारेकर्यांना परळीतील भर चौकात आणून शिक्षा द्यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर चालवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब यांनी केली आहे. मस्साजोग येथील तत्कालीन सरपंच स्व.संतोष देशमुख आणि बीडमधील उमेश दळवी यांची ज्या क्रुरतेने हत्या करण्यात आली होती. त्याच पध्दतीने तोहिद खान देखील जातीयवाद्यांच्या अमानुषतेला बळी पडला आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे शेख मुजीब यांनी म्हटले आहे.
परळी येथील सरदारनगर भागातील अफजल उर्फ तोहिद केरातीखान पठाण (वय 36) या तरूणाची अत्यंत अमानुषपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तोहिद खान याच्या अंगावर असलेले वळ, चेहर्यावर आणि गुप्तांगावर झालेली मारहाण माणूसकीला काळिमा फासणारी आहे. अत्यंत द्वेषाने आणि अमानुषतेने तोहिद खान याला मारहाण झालेली आहे. एका सर्वसामान्य कुटूंबातील तरूणाची आशा पध्दतीने केवळ जातीयद्वेषातून झालेली हत्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. तोहिद खान याची हत्या करून मारेकर्यानी त्याचा मृतदेह परळीतील रेल्वे रुळाजवळ फेकून दिला. प्रथमदर्शनी ही घटना अपघात किंवा आत्महत्या वाटावी असेच स्वरूप या घटनेला दिले गेले होते. मात्र काल दुपारनंतर सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये मारेकरी अन्य एकाच्या मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून येत आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या संभाषणाची ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार जातीयद्वेषातून झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुसलमानाला मारल्याचे समाधान आहे असा समोरचा मारेकरी बोलत असल्याचे क्लिपमध्ये दिसून येत आहे. यावरून एकमेकांना सांगून आणि त्या संभाषणाचा व्हिडीओ तयार करून तोहिद खानची हत्या करण्यापर्यंत गेलेली मजल केवळ मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर अन्य समाजासाठी देखील अत्यंत घातक आहे. अशा पध्दतीने सांगून आणि जातीयद्वेषातून जर हत्या होवू लागल्या तर जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणाला केवळ आर्थिक व्यवहाराचे कारण सांगितले आहे. वास्तविक पाहता तोहिद खान याची अमानुषपणे झालेली हत्या आणि त्यानंतरचे व्हायरल झालेले संभाषण पाहता ही हत्या केवळ आणि केवळ जातीयद्वेषातून आणि मुस्लिम आहे म्हणूनच झालेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे याप्रकरणात स्वत: पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालावे आणि मारेकर्यांच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांना भर चौकात उभे करून शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात कुणी अशा प्रकारचे निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणार नाही असे शेख मुजीब यांनी म्हटले आहे.
हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकर्यांना भरचौकात शिक्षा द्या-शेख मुजीब
परळीतील तोहीद खान या तरूणाची अत्यंत अमानुषपणे झालेली हत्या अतिशय निंदनीय आहे. आर्थिक व्यवहार हे कारण असू शकत नाही. केवळ जातीय द्वेषातून ही हत्या झाल्याचे व्हायरल व्हिडीओतून समोर आलेले आहे. त्यामुळे आरोपी अटक झाले म्हणून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवू नये सदरील हत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत सखोल चौकशी करावी, हत्या झाल्यानंतर सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची पडताळणी करून मारेकरी ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहे त्याचाही चौकशी करावी, याप्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याचाही शोध घ्यावा आणि तोहीदच्या मारेकर्यांना परळीच्याच भर चौकात उभे करून शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचेे शेख मुजीब यांनी केली आहे