नंदकिशोर मुंदडा यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल; माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाईंची उपस्थिती !

नंदकिशोर मुंदडा यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल; माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाईंची उपस्थिती !
*अंबाजोगाई प्रतिनिधी ;बालाजी देशमुख*
अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, शनिवार दिनांक १५/११/२०२५ रोजी नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कोणताही गाजावाजा किंवा मोठे शक्तिप्रदर्शन न करता, निवडक समर्थक आणि शुभचिंतकांच्या उपस्थितीत मुंदडा यांनी अर्ज दाखल करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या साध्यासोप्या पद्धतीमुळे निवडणुकीच्या धामधुमीतही एका वेगळ्या संदेशाची नोंद झाली आहे.
विशेष उपस्थिती:
यावेळी, अंबाजोगाई नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई , मा.जिप सदस्य बाळासाहेब दोडतोले ,वैजनाथ देशमुख, सारंग पुजारी, संजय गंभीरे, , नूर पटेल, महादू मस्के, चोपणे या मान्यवरांची विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली. शेख रहीम भाई यांनी मुंदडा यांना शुभेच्छा देत, त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. ज्येष्ठ समाजसेवकाच्या उमेदवारीला माजी उपनगराध्यक्षांनी दिलेले पाठबळ, हे शहरातील सामाजिक आणि राजकीय समन्वय दर्शविते.
नंदकिशोर मुंदडा हे अंबाजोगाई शहरात समाजसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांची साधी राहणी आणि लोकांमध्ये असलेली लोकप्रियता, या निवडणूक रिंगणात त्यांना किती यश मिळवून देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



