काही तासात भुरट्या चोराच्या मुसक्या आवळण्यात म्हसळा पोलिसांना यश..

काही तासात भुरट्या चोराच्या मुसक्या आवळण्यात म्हसळा पोलिसांना यश..
म्हसळा हिंदु ग्रामस्थांन कङुन म्हसळा पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले अभिनंदन.
द. रा. जि. उपसंपादक: संतोष उध्दरकर.
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील चंदनवाडी येथील रुक्मीणी रामजी धुमाळ वय वर्षे ६५ या म्हसळा बाजार पेठेत काही जिवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी आले असता म्हसळा शहर बस स्थानक शेजारील शौचालय इथे लघुशंकेसाठी गेलेली असता त्यांच्या जवळील पैसे असणारी पांढऱ्या रंगाची पिशवी पायरीवर ठेवली असता तिथेच असलेल्या एका भुरट्या चोराने त्या वयोवृद्ध महिलेची पिशवी घेऊन पोबारा केला, यावेळी त्या महिलेने आरडा ओरड केली, त्या वेळी मिनीडोअर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्या महिलेची विचारणा करून तात्काळ म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून महिलेने केलेल्या वर्णनावरून काही तासातच अलताफ अखलाक तालीब वय वर्षे २८ रा. वरवठणे याच्या मुसक्या आवळण्यात म्हसळा पोलिसांना यश आले. सदर घटनेचा पंचनामा करून त्या महिलेची रक्कम ५००० हजार रुपये महिलेच्या स्वाधिन करण्यात आली. काही तासातच चोराच्या मुसक्या आवळुन त्याला अटक करण्यात आली व वयोवृद महिलेची रक्कम परत करण्यात आली, म्हसळा पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद व अभिमानास्पद कामगीरीची दखल घेऊन म्हसळा मिनिडोअर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व काही हिंदू ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन म्हसळा पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच आपल्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हसळा तालुक्याला लाभल्याने म्हसळा सुरक्षित आहे असे मिनीडोअर रिक्षा संघटनेचे मनोहर तांबे, अभय कलमकर यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, हवालदार देवढे, कॉ. चितारे, कॉ. पूरी, कॉ. मुल्ला, कॉ. ठाकरे, चालक राठोड, नगरसेविका राखी करंबे, मनोहर तांबे, अभय कलमकर, भरत चव्हाण, अजय करंबे, पत्रकार संतोष उद्धरकर.



